Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे PUBG 24 तास बंद राहणार

 पोलीसनामा ऑनलाइन –  जगातील टॉप मोबाइल गेम्सपैकी एक म्हणजे पबजी असून भारतासह संपूर्ण जगात पबजीचे असंख्य चाहते आहेत. विशेषत: तरुणाइला गेमने प्रचंड वेड आहे. आता पबजीच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 4 एप्रिल मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 5 एप्रिल मध्यरात्री 12 पर्यंत ‘पबजी’चे शटडाऊन असणार आहे. म्हणजेच हा गेम 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

कोरोना व्हायरस. करोना व्हायरसशी लढा देताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कंपनीने . पबजी 24 तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीने युजर्सना नोटिफिकेशनद्वारे दिली आहे.

इतका प्रसिद्ध गेम 24 तासांसाठी बंद ठेवला जाणार असल्यामुळे तरुणांना दुसर्‍या खेळाकडे वळावे लागणार आहे. जगभरातील सर्व्हर बंद करण्यात येणार असल्याने भारतातही लोकांना हा गेम 24 तासांसाठी खेळता येणार नाही. चीन, हाँगकाँग, मकाऊ आणि तैवान येथेसुद्धा पबजी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पबजीवर बंदी करण्यात आली आहे आणि काही ठिकाणी या गेमची एक वेगळी व्हर्जन उपलब्ध आहे. चीनमध्ये हा गेम – गेम फॉर पीस नावाने उपलब्ध आहे.