भारतात आजपासून काम करणार नाही PUBG मोबाइल, कंपनीने केला खुलासा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – पब्जी मोबाइल(PUBG mobile)आणि पब्जी मोबाइल लाइट (PUBG mobile LITE) 30 ऑक्टोबरपासून भारतात पूर्णपणे काम करणे बंद करतील. कंपनीने गुरूवारी फेसबुकवर एक पोस्टमध्ये या बाबत माहिती दिली. भारताने सुमारे एक महिना अगोदर 118 अ‍ॅप्सवर प्रतिबंध लावला होता. या 118 अ‍ॅप्समध्ये भारतात बहुचर्चित गेमिंग अ‍ॅप पब्जीवरसुद्धा प्रतिबंध लावला होता. भारत सरकारने हे अ‍ॅप्स बंद करण्याचे कारण चीनकडून सुरक्षा धोक्यात असल्याचे सांगितले होते. ही ताजी घोषणा अशावेळी आली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच पब्जी मोबाइलचे डेव्हलपर कॉर्पने लिंक्डइनवर एक पोस्टमध्ये म्हटले होते की, भारतात बॅटल रॉयल-स्टाइव्ह गेम्स पुन्हा येण्याची शक्यता आहे.

मोबाइल गेमची मालकी असलेल्या टेन्सेंट गेम्स(Tencent Games))ने फेसबुकवर एक पोस्टमध्ये म्हटले की, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे. यासोबत त्यांनी भारतात पब्जी मोबाइल आणि पब्जी मोबाइल लाइट फॅन्सला समर्थन दिल्याबद्दल आभार मानले. कंपनीने हे सुद्धा म्हटले की, यूजर्सच्या डेटाची सुरक्षा करणे नेहमीच आमची प्राथमिकता होती. आम्ही नेहमी भारतात डेटा सुरक्षा कायदे आणि रेग्युलेशन्सचे पालन केले आहे. आमच्या प्रायव्हसी पॉलिसीत हे म्हटले आहे की, सर्व यूजर्सची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रोसेस केली जाते. टेन्सेंट पब्जी मोबाइलचे डेव्हलपर पब्जी कॉर्पोरेशनला सर्व अधिकार परत आहेत जी क्राफ्ट्स गेम युनियनची कंपनी आहे.

भारतात सुमारे 25 टक्के होते पब्जीचे यूजर्स
पब्जी मोबाइल आणि पब्जी मोबाइल लाइटवर प्रतिबंध त्यावेळी लावण्यात आला जेव्हा गेमिंग प्लॅटफॉर्मवर कोविड-19 महामारीमुळे युजर बेसमध्ये खुप वाढ झाली झाली होती. हा प्रतिबंध भारतातील खेळ आणि व्यवसायिक गेमर्ससाठी सुद्धा एक धक्का होता. जे पब्जी मोबाइल युजरबेसचे सुमारे 25 टक्के हिस्सा आहेत.

कंपनीला झाला तोटा
भारतात या अ‍ॅप्सवर प्रतिबंध लावल्यानंतर दुसर्‍याच दिवशी चीनच्या या टेक कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूत सुमारे 34 अरब डॉलर (सुमारे 2,48,000 रुपये) ची घसरण दिसून आली होती. टेन्सेन्ट पब्जी गेमिंग अ‍ॅपद्वारे भारतात सर्वात जास्त कमाई करत होती.

You might also like