पबजी खेळताना अल्पवयीन मुलगी पडली पार्टनरच्या प्रेमात

पोलिसनामा ऑनलाईन – पबजी गेमच्या वेडापायी एक अल्पवयीन मुलीने थेट पार्टनरचे घरे गाठल्याची घटना मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये घडली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार इंदूर पोलिसांमध्ये करण्यात आली होती. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता ती मुलगी थेट पंजाबमध्ये आढळून आली. पबजी गेम खेळत असताना तिची ओळख एका मुलाशी झाली. गेम खेळताना ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ती पंजाबला त्याच्या घरी पोहोचली होती.

इंदूरच्या मल्हारगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे कुटुंब राहते. या कुटुंबाने 31 ऑगस्टला मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जेव्हा चौकशीत या मुलीबद्दल विचारणा केली असता ती पबजी गेम खेळायची अशी माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी मोबाइल तपासला असता ती एका मुलासोबत खेळत असल्याचे समोर आले. मित्राचा वाढदिवस असल्यामुळे पंजाबला जाणार असल्याचे तिने आईला सांगितले होते. त्यामुळे या अल्पवयीन मुलीने थेट पंजाबला पळून जाण्याचा प्लॅन केला. ती अल्पवयीन मुलगी थेट विमानाने इंदूरहून मुंबईला गेली. तेथून दोघे जण अमृतसरला गेले. पोलिसांनी जेव्हा मुलीच्या मोबाइल तपासले असता ती पंजाबमध्ये असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने इंदूरहून अमृतसर गाठत मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन कुटुंबाच्या स्वाधीन केले. तिच्या मित्राला अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like