Public Holiday In Maharashtra | राज्य सरकारचा मोठा निर्णय! राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Public Holiday In Maharashtra | 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Pran Pratishtha) केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जाणार आहे. सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शासनाचे उप सचिव रो.दि. कदम पाटील यांनी सुट्टीचा शासन आदेश शुक्रवारी (दि.19) जारी केला आहे.

दुसरीकडे केंद्र सरकाने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या दिवशी देशभरात सुट्टी द्यवी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारने 22 जानेवारीच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे अर्धा दिवस शासकीय कार्यालये सुरु राहणार आहे. केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात सट्टीचा उल्लेख केला आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

22 जानेवारीला देशभरातील जनतेने दिवाळी साजरी करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडे सुट्टी देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही नेत्यांनी सरकारकडे केली होती. राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार आज सुट्टीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | जीएसटीची रक्कम न भरता पावणे तीन कोटींची फसवणूक, एरंडवणे परिसरातील प्रकार

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : नरबळी द्यावा लागेल, अन्यथा मुलगा व पतीचा मृत्यू होऊन घराचा नायनाट होईल, 35 लाख उकळणाऱ्या मांत्रिकासह पाच जणांवर FIR