शहरवासीयांचा अपमान करणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा जाहीर निषेध 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा भाजपाने कारभार सुरु करताना सत्तारुढ पक्षनेते व स्थायी समिती सभापती यांनी महापालिकेचे खर्च टाळण्यासाठी महापालिकेचे वाहन वापरना नाही, मोबाईल वापणार नाही, रोजनिशा डायरी बंद केली होती. त्याच बरोबर स्मृती चिन्ह, पुष्प गुच्छ खर्च बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ऐवढेच नव्हे तर महापालिका अधिकारी कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना स्मृति चिन्ह देण्याची प्रथा बंद करण्यात आली होती. मात्र मंगळवारी हिंजवडी, शिवाजीनगर मेट्रो टप्पा ३ भूमिपूजनच्या कार्यक्रमात निमंत्रण नसताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शहरवासीयांचा अपमान करणाऱ्या दोन्ही पालिकेच्या महापौरांचा सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर निषेध केला आहे.

मंगळवार दि. १८/१२/२०१८ रोजी हिंजवडी, शिवाजी नगर मेट्रो टप्पा ३ भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालेवाडी या ठिकाणी सपन्न झाला. या कार्येक्रम पत्रिकेत पुण्यनगरीचे महापौर मुक्ता टिळक व पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर राहुल जाधव यांचे नाव टाकले नव्हते. हा पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचा अपमानच होता.

असे असताना महापौर राहुल जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभीप्रेत असणारी भूमिका घेऊन शहरवांशियांचा अपमान म्हणून निषेध नोंदविणे गरजेचे होते. मात्र तसे न करता पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौरांनी पंतप्रधान मोदी यांना संत तुकाराम महाराज व  छत्रपती शिवाजी महाराजांचे (भक्ती शक्ती) स्मृति चिन्ह देऊन स्वागत केले. पुण्याच्या महापौरांनीही पंतप्रधान मोदी यांचे स्मृति चिन्ह देऊन स्वागत केले. पुणे व पिंपरी चिंचवड शहरवासीयांचा अपमान करणा-या दोन्ही महापौरांचा जाहीर निषेध केला आहे.