Public Prosecutor Praveen Chavan | तेजस मोरेने आरोप फेटाळले, सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या अडचणीत वाढ

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Public Prosecutor Praveen Chavan) यांना आपण कोणतेही घड्याळ भेट (Clock Gift) दिले नसून त्यांनी अकारण आपल्यावर हा आरोप केला आहे. या स्टिंग ऑपरेशन मुळे (Sting Operation) सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Public Prosecutor Praveen Chavan) यांचा काळा चेहरा समोर आल्याचे तेजस मोरे (Tejas More) यांनी सांगितले.

भाजपच्या (BJP) नेत्यांना अडकवण्यासाठी कशाप्रकरे कट रचला जात आहे याचा पुरावा असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करताना स्टिंग ऑपरेशनचा पेन ड्राईव्ह अधिवेशनात सादर केला होता. त्यावेळी प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Public Prosecutor Praveen Chavan) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे म्हटले होते. तसेच ते कथित स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे या तरुणाने केलं असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. तसेच तेजस मोरेने चव्हाण यांच्या कार्यालयात एक घड्याळ लावलं होतं. त्यात कॅमेरा बसवला होता. नंतर आवाज बदलून हे कथित स्टिंग ऑपरेशन केले, असा आरोप चव्हाण यांनी केला. या आरोपानंतर तेजस मोरे याने मोठा खुलासा केला आहे.

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण खोटे बोलत आहेत

आपल्या कार्यालयात तेजस मोरे याने भेट दिलेल्या घडाळ्यात स्पाय कॅमेरा (Spy Camera) बसविला होता, त्यातून हे स्टिंग ऑपरेशन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर तेजस मोरे यांनी आपली बाजू मांडली. तेजस मोरे यांनी सांगितले की, अॅड. प्रवीण चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ अथवा छुपा कॅमेरा बसविला नाही. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप (False Allegations) केले. त्यांनी पुरावे (Evidence) द्यावेत.

अनेक खटल्यांचे जबाब मी नोंदवले

प्रवीण चव्हाण यांच्यासोबत असलेल्या संबंधाबाबत तेजस मोरे यांनी सांगितले, मी सुरुवातीला त्यांना देव मानत होतो. मी पाच महिने तरुंगात होतो. त्यांनी जामीनावर माझी सुटका (Release on Bail) केली. त्यांच्या कार्यालयात असताना एकदा त्यांच्या इंग्रजी ग्रामरमधील काही चुका मी दुरुस्त केल्या होत्या. माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यातील जबाब ते सांगतील त्या पद्धतीने मी इंग्रजीत टाईप करुन देत होतो. अनेकांचे जबाब मी नोंद केले आहेत. मला कायद्याचे ज्ञान नसल्याने असे जबाब तयार करुन देणे सरकारी वकीलाचे काम आहे, असा समज होता.

पुणे पोलिसांनी बनावट पुरावे प्लांट केले

भाजप नेते गिरीश महाजन (BJP leader Girish Mahajan) यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी तयार केले. 9 जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी (Pune Police) भोईटे व इतरांच्या जळगावमधील (Jalgaon) घरी छापे घातले. पुणे पोलिसांनी भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट केले होते. तेव्हापासून मी अॅड. चव्हाण यांच्यापासून दूर गेलो असल्याचा गौप्यस्फोट मोरे यांनी केला.

पुणे पोलिसांची जेवणाची मी सोय केली

जळगाव येथे पुणे पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी ते औरंगाबाद (Aurangabad) येथे जेवणासाठी थांबले होते.
चव्हाण यांच्या सांगण्यावरुन त्यांची जेवणाची सोय मी केली होती.
त्याचे बिलही गुगल पे द्वारे आपण दिल्याचा दावा मोरे यांनी केला आहे.
महाजन यांना अडकविण्यासाठी आधी अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितल्याचे चव्हाण सांगत होते
. मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती तेजस याने दिली.

Web Title : Public Prosecutor Praveen Chavan | tejas more says false allegations againstme increase in difficulty of praveen chavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Paracetamol Usage | अल्कोहोल घेतल्यानंतर घेत असाल पॅरासिटामॉलची गोळी तर व्हा सावध ! ‘या’ अवयवाचे होऊ शकते सर्वात जास्त नुकसान

 

Nushrratt Bharuccha Monokini Photo | स्विमिंग पूलजवळ नुसरत भरूचानं दाखवला बोल्ड अंदाज, मोनोकिना घालून सोशल मीडियावर केला कहर…

 

Rupali Thombare Patil | शरद पवारांवरील टीकेनंतर रूपाली पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; बिरोबाला घातलं ‘हे’ साकडं !