पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या गाडीला अपघात

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला आहे.या अपघातात ते थोडक्यात बचावले असून सुखरूप आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.हा अपघात सोमवारी (दि.४) संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास खोपोली हद्दीत झाला आहे. अपघातात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सव्वासातच्या सुमारास सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची गाडी ही मुंबईच्या दिशेने जात होती,सोबतच सुरक्षा रक्षकाचा ताफा असलेली गाडी होती. ताफ्यातील पोलिसांची गाडी पाठीमागे होती,अचानक उज्ज्वल निकम हे बसलेल्या गाडीला ताफ्यातील पाठीमागील गाडीने जोरात धडक दिली. यात सरकारी वकील उज्ज्वल निकम हे थोडक्यात बचावले असून ते सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या अपघातात पोलीस कर्मचारी तोंडसे हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात किलोमीटर ३७ जवळ झाला आहे.अपघात झाल्यानंतर उज्वल निकम यांना दुसऱ्या गाडीतून मुंबईच्या दिशेने रावना करण्यात आले आहे. उज्ज्वल निकम यांच्यावर एमजीएम रुग्णालायात उपचार सुरु असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.