संगमनेर : इंदोरीकर महाराज खटल्यातून सरकारी वकिलांची माघार

संगमनेर : पोलिसनामा ऑनलाईन – वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात कीर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर खटला दाखल केला आहे. मात्र आता या खटल्यातून सहायक सहकारी अभियोक्ता अ‍ॅड. बी. जी. कोल्हे यांनी माघार घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत. त्याविरोधात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. भवर यांच्यातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. कोल्हे काम पाहत आहेत. या खटल्यातून माघार घेतली आह. त्यांनी मला हे काम पाहण्याची इच्छा नसल्याचे कार्यालयाला लेखी कळविले आहे. तसेच माझी बदनामी करणाऱ्यांना नोटीस पाठविणार असल्याचे अ‍ॅड. कोल्हे यांनी सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

You might also like