ED च्या नोटीशीचा पवारांना राजकीय फायदा ! ग्रामीण भागातून पवारांना पाठिंबा

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर केंद्रीय दक्षता आयोगाने या बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह तत्कालीन संचालकांची चौकशी करण्याचे आदेश नाबार्डला दिले आहेत असे समजत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे गुन्हे दाखल झाल्याने पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे असले तरी पवारांना याचा फायदा होत आहे असेही दिसत आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर 25 सप्टेबंर रोजी बारामतीत बंद पाळण्यात आला होता. यानंतर अनेक समाजिक संघटनांनी बंदचं आव्हान केलं होतं. सरकारच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचं संघटनांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीकडून गुन्ह्यांचा जाहीर निषेध करत आज मंठा, आष्टी शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातून पवारांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. याचा फायदा पवारांना आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीला होऊ शकतो.

पवारांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवारांच्या समर्थकांनी मंठा, आष्टी बंदचं आव्हान केलं. कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत शहरात फिरून  व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. आज सकाळपासूनच फिरून कार्यकर्त्यांनी शहरातील दुकाने बंद केली.

Visit : policenama.com