PPF खात्याशी संबंधीत ‘हे’ नियम बदलले, 30 जूनपर्यंत आवश्य करा हे काम, अन्यथा होईल मोठे नुकसान
नवी दिल्ली : सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी पीपीएफमध्ये किमान जमाची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवली आहे. अगोदर हा कालावधी 31 मार्च 2020 होता. जर तुम्ही किमान रक्कम 500 रुपये या महिन्यांच्या अखेरपर्यंत जमा नाही केली तर तुम्हाला दंड लागू शकतो. अशाच प्रकारे जर तुम्ही आपल्या रिकरिंग डिपॉझिट अकाऊंटमध्ये एप्रिल आणि मे 2020 मध्ये पैसे जमा नाही केले तर 30 जूनपर्यंत कोणत्याही दंडाशिवाय गुंतवणूक करू शकता. या तारीखेनंतर पैसे जमा केल्यास दंड द्यावा लागेल.
30 जूनपर्यंत आहे हे काम करणे
जर तुम्ही 31 मार्च, 2020 ला मॅच्युअर झालेल्या पीपीएफ अकाऊंटला पुढे सुरू ठेवू ईच्छिता आणि लॉकडाऊनमुळे करू शकला नसाल तर तुमच्याकडे हे करण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ आहे. पोस्ट विभागाने याबाबत 11 एप्रिलला एक सर्क्युलर जारी केले होते. यानुसार पीपीएफ अकाऊंट पुढ वाढवण्यासाठी फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 30 जून केली आहे.
यावर्षी सरकारने बदलले पीपीएफ खात्याचे नियम
(1) पीपीएफ खात्यात जमा रक्कमेचे नियम
पीपीएफ खाते उघडण्यासाठी मिनिमम अमाऊंटमध्ये काही बदल केले आहेत. ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असू नये आणि ती 50 रुपयांच्या मल्टीपलमध्ये असावी. एका आर्थिक वर्षात खात्यात कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खाते उघडण्यासाठी अब फॉर्म ऐवजी फॉर्म 1 भरावा लागेल.
नव्यात नियमात 12 वेळा पैसे जमा करण्याची मर्यादा बंद केली आहे. म्हणजे आता तुमच्या खात्यात तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा सुद्ध पैसे भरू शकता.
(2) मॅच्युरिटीचे नियम
पीपीएफ अकाऊंटचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा असतो. यानंतर जर कुणी हे खाते 5 वर्षांसाठी पुढे वाढवत असेल तर त्यांना मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत फॉर्म 4 जमा करावा लागेल. यासाठी पूर्वी फॉर्म एच भरावा लागत होता.
(3) पीपीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम
अशाप्रकारे मॅच्युरिटीनंतर सुद्धा विना डिपॉझिट करताही पीपीएफ खाते सुरू ठेवता येईल. असे केल्याने मॅच्युरिटीच्या वेळी जी रक्कम असेल त्यावर व्याज मिळत राहील. या व्याजाबाबत वेळोवेळी सब्सक्रायबरला माहिती दिली जाईल. तसेच सब्सक्राइबरला एका आर्थिक वर्षात एक वेळ पैसे काढण्याची संधी मिळेल.
(4) पीपीएफ लोनवर व्याजदर
पीपीएफ अकाऊंटच्या आधारावर लोन घेतल्यानंतर त्याची प्रिंसिपल अमाऊंट पे-इन-स्लिपद्वारे जमा केली जाऊ शकते. ती सब्सक्राइबरच्या लोन अकाऊंटमध्येच क्रेडिट केली जाईल. जेव्हा प्रिंसिपल अमाऊंट पूर्णपणे दिली जाईल, तेव्हा सब्सक्राइबर्स वार्षिक 1 टक्केच्या दराने व्याजाच्या आधारे दोन महिन्यापेक्षा कमीच्या इन्स्टॉलमेंटमध्ये व्याजाची रक्कम जमा करू शकता. हे पैसे भरणे पुढच्या महिन्या पासूनच सुरू होईल. जर लोनची रक्कम वेळेवर चुकवली नाही तर पेनल्टी म्हणून वार्षिक 6 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.
(5) कसे कॅलक्युलेट होईल व्याज
पूर्ण महिन्याच्या रक्कमेवर व्याज मिळवण्यासाठी माहिती दिली जाते की, प्रत्येक महिन्याच्या 5 तारीखेच्या अगोदरच पीपीएफ अकाऊंटमध्ये डिपॉझिट करावे. जर तुम्ही कुठल्या पीपीएफ इंटरेस्ट कॅलक्युलेटरचा वापर करता तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल की, व्याज दर महिना पीपीएफ खात्यात जमा सर्वात कमी रक्कमेच्या आधारावर आकारले जातेय. ही रक्कम प्रत्येक महिन्याच्या 5 तारीखेपासून महिन्याच्या अखेरीस जी रक्कम कमी असेल, त्यावर व्याज आकारले जाते. प्रत्येक तिमाहीमध्ये सरकार पीपीएफवर मिळाणार्या व्याजाला रिवाईज करते. व्याजाची रक्कम सब्सक्रायबरच्या खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी दिली जाते.