कर्मचार्‍यांच्या मदतीनं सरकारी बँकेत वाढतंय घोटाळयाचं प्रमाण, 3 महिन्यात झाली 32 हजार कोटींची फसवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खूप प्रयत्न करून देखील बँक अधिकारी आणि कर्मचारी यांनी सरकारच्या धोरणावर पाणी फेरल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस नेता व राज्यसभा खासदार मोतीलाल वोरा यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर (Minister of State for Finance) यांनी सांगितले की, १ एप्रिल पासून ३० जून पर्यंत सरकारी क्षेत्रा (PSU Bank) तील बँकांमध्ये फसवणुकीचे २,४८० घटना घडल्या असून त्यामध्ये ३१,८९८.६४ कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश आहे. हा आकडा त्यांनी भारतीय रिजर्व बैंक (RBI) च्या द्वारे दिला.

SBI च्या संबंधी देखील प्रश्न केला- वोरा यांनी भारतीय स्टेट बँक मधील होणाऱ्या घोटाळे थांबत का नाहीत याबाबत देखील प्रश्न उपस्थित केला आणि यात देखील बँकेतील कर्मचाऱ्यांचा हात आहेका याची विचारपूस केली.

उत्तर देताना ठाकूर यांनी सांगितले की, आधी या संबंधित फसवणुकीच्या बाबतीत बँकेतील कर्मचाऱ्यांची योग्य ती कारवाई केली जात नव्हती. परंतु आता शिस्तीचे पालन करणे आणि तसे न केल्यास कठोर कारवाईची अंबलबजावणी केली जात आहे.

सीए राजनदास गुप्ता यांच्यामते या घटना या कालावधीतच होत आहेत असे म्हणणे कठीण आहे. खरतर याबतीत काम खूप आधीपासून चालू आहे. याबाबत खुलासा आत्ता झाला असेल परंतु हे फसवणुकीचे प्रकार कस्टमर सोबत घडत नसून ही ती प्रकरणे आहेत त्यात बँकांमधून लोन घेऊन सरकारशी फसवणूक केली आहे.

यामधील जास्तीत जास्त घटना एनपीए होण्यापासून बचावासाठी लोन रिस्ट्रक्चरिंग (यामध्ये बँक जुन्या लोन धारकांनाच नवीन लोन देते) चे झाले असतील. कमी प्रॉपर्टी वर जास्त लोन घेतले असणार.

सर्वात जास्त फसवणुकीचे प्रकार एसबीआई मध्ये- या वर्षात १ एप्रिल ते 30 जून दरम्यान सर्वात जास्त १,१९७ इतके फसवणुकीचे प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये घडले आहेत. त्यामध्ये एकूण १२,०१२ कोटी रुपयांचा समावेश आहे.

यामध्ये दुसरा नंबर इलाहाबाद बँकेचा आहे. त्यात ३८१ फसवणुकीच्या घटना घडल्या असून २,८५५ कोटी रुपयांच्या रक्कमेचा समावेश आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकून १९४ घटना घडल्या, त्यात १,९८२ कोटी रुपयाच्या रकमेचा समावेश आहे.

बँक कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी हात मिळवणी करून केली फसवणूक- बँकेमधील कर्मचारी आणि अधिकारी हे दोन्ही मिळून या फसवणुकीस चालना देत असतात त्याशिवाय अशा घटना होऊ शकत नाही. इलाहाबाद बँकेत झालेल्या फसवणुकीच्या ८७ घटनांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यसभेत दिलेल्या रिपोर्ट नुसार भारतीय स्टेट बँकच्या ५६ घटनांमध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच पंजाब नॅशनल बँकच्या २७ घटनांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

फसवणुकीच्या घटना कमी होण्यासाठी सरकार काय करणार आहे ?
१)
५० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे असणारे सर्व खाते, जर त्याचा समावेश एनपीए मध्ये होत असेल तर बँकेद्वारे फसवणुकीच्या दृष्टिकोनातून त्याचा तपास करण्यात येईल. तपास करण्यात आलेल्या निष्कर्षांच्या आधारे तयार केलेल्या रिपोर्ट ला एनपीए समीक्षेसाठी बँकेच्या समितीसमोर ठेवले जाईल.

२) भारतीय रिजर्व्ह बँक च्या फसवणुकीबाबत सूचित केल्यानंतर या प्रकाराचा तात्काळ तपास सुरु करण्यासाठी पाऊले उचलावीत.

३) फरारी आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्तेची जोड, गुन्हेगारांच्या संप्पत्तीला जप्त करून गुन्हेगारांना कोणत्याही दिवाणी दाव्याचे रक्षण करण्यासाठी हक्क न देता त्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात यावे.

Visit : Policenama.com