‘ही’ सरकारी कंपनी भारतात आणतेय 800 KM प्रति तास वेगानं धावणारी रेल्वे, रूळावर नाही चालत ‘मॅग्लेव ट्रेन’

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) ने मॅग्लेव्ह ट्रेन भारतात आणण्यासाठी SwissRapide AG सोबत करार केला आहे. मॅग्लेव्ह ट्रेनचे मॉडल मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्रात (आरआरसीएटी) ने फेब्रुवारी 2019 मध्ये तयार केले होते. केंद्राचे शास्त्रज्ञ आर. एन. शिंदे यांनी 50 लोकांच्या टीमसह मॅग्लेव्ह ट्रेनचे मॉडल 10 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर तयार केले होते. यामध्ये ट्रेन मॅग्नटिक फिल्डच्या पृष्ठभागावर चालताना दिसली. सांगितले जात आहे की, ही ट्रेन 800 किमी प्रति तास वेगाने धावू शकते. सध्या ही ट्रेन जपान अणि चीनमध्ये धावत आहे.

मॅग्नटिक फिल्डच्या मदतीने रूळाऐवजी धावणार हवेतून
भेलने म्हटले की, शहरी वाहतूकीची कक्षा वाढवण्यासाठी त्यांनी स्वीस रॅपीड एजीसोबत करार केला आहे. या अंतर्गत कंपनी मॅग्लेव्ह ट्रेन भारतात आणेल. ही ट्रेन रूळावर धावण्याऐवजी हवेत धावते. यासाठी ट्रेनला मॅग्नटिक फिल्डच्या मदतीने नियंत्रित केले जाते. यासाठी तिचा रूळांशी थेट काहीही संबंध येत नाही. ही ट्रेन 500-800 किमी प्रति तास वेगाने धावते. हा करार पीएम नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत अभियान लक्षात घेऊन स्वीस रॅपीड एजीच्या मदतीने केला आहे.

पाच दशकापासून भारतीय रेल्वेचा विश्वासू भागीदार भेल
स्वीस रॅपीड एजीसोबत करण्यात आलेला करार इंटरनॅशनल टेक्नॉलॉजीला भारतात आणणे आणि त्याची निर्मिती करण्यात भेलला सक्षम बनवेल. स्वीस रॅपीड एजी मॅग्लेव्ह प्रॉजेक्ट्स व टेक्नॉलॉजीज प्रमोशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्लॅनिंग, डिझाईन, इम्प्लीमेंटेशन आणि कमिशनिंगमध्ये तज्ज्ञ आहे.

कंपनीची अल्ट्रा हाय स्पीड मॅग्लेव्ह रेल्वे सिस्टम ट्रान्सरॅपिड मॅग्लेव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात वेगळी ओळख आहे. तर, भेल नव्या टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात पुढे आहे. ही सरकारी कंपनी मागच्या पाच दशकांपासून भारतीय रेल्वेच्या विकासात विश्वासू भागीदार आहे. भेल रेल्वेला इलेक्ट्रिक व डिजल लोकोमोटिव्स, इलेक्ट्रिकल मल्टीपल युनिट आणि प्रपल्शन सिस्टम सेट्सचा पुरवठा करते. चीन-जापान वगळता अमेरिकेकडे सुद्धा हे तंत्रज्ञान नाही.