महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन

भद्रावती – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या(Maharashtra State Marathi Press Association)२०२१ च्या नूतन दिनदर्शिकेचे येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात नुकतेच थाटात प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल धानोरकर होते.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर बोरघरे, सरचिटणीस अब्बास अजाणी, संघटक जावेद शेख प्रभृती मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर डाॅ.मंगेश आरेवार आणि अनिल धानोरकर यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन करण्यात आले.आकर्षक आणि परिपूर्ण माहिती असलेल्या या दिनदर्शिकेची मान्यवरांनी यावेळी प्रशंसा केली. तसेच त्यांनी पत्रकार संघाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन रुपचंद धारणे यांनी केले.कार्यक्रमाला पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.