प्रसिद्धी विनायक : राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून मोदींवर पुन्हा फटकारे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून विरोधकांच्या वर्मावर बोट ठेवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या पद्धतीवर ठाकरे शैलीत फटकारे ओढले आहेत. स्वत: च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक अशी उमपा त्यांनी व्यंगचित्राद्वारे मोदींना दिली आहे. तसेच मोदी बाप्पाचे वाहन म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B016N49F20,B07332W4WG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’70b625b5-baf1-11e8-afdc-5d906af65ac4′]

मोदींच्या कार्यपद्धतीवर फटकारे ओढताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींनी काही माध्यमांना कसे मुठीत ठेवले आहे. तसेच ईव्हिएम आणि पैशाच्या बळावर मोदींनी आपले वजन कसे वाढवले आहे दर्शविले आहे. ठाकरे यांनी काढलेले व्यंगचित्र हे खूप बोलके ठरले आहे. स्‍वत:च्‍याच प्रतिमेच्‍या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक, असे व्यंगचित्राला नाव देत त्यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे. याच मोदी बाप्पाची पुजा करताना स्वत: पंतप्रधान मोदी दिसत आहेत.

पेट्रोल, दरवाढीची आग आणखी भडकली

तसेच या बाप्‍पाची पुजा करताना व्‍यंगचित्रात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह सह अमित शहा दाखविण्यात आले आहेत.