तब्बल ‘१२’ वर्षानंतर चित्रपटात झळकणार अभिनेत्री ‘शिल्पा शेट्टी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जिला सध्या फिटनेस गुरु म्हणले जाते अशी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या चित्रपटामध्ये पुन्हा येण्याच्या तयारीला लागली आहे. ती लवकरच आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करेल. फिटनेस आणि टिव्हि शो मध्ये चर्चेत असणारी शिल्पाने १९९३ मध्ये शाहरुख खानच्या चित्रपट ‘बाजिगर’ मधून पदार्पण केले होते. या चित्रपटामधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली.

शिल्पाने सांगितले की, ‘यावेळी माझ्याकडे कमीतकमी ५ स्क्रिप्ट आहेत. सध्या मी या स्क्रिप्ट वाचत आहे. यामधील जी स्क्रिप्ट मला सगळ्यात जास्त आवडेल त्या चित्रपटामधून मी पुन्हा नव्याने सुरुवात करेल. ‘

गेल्या काही दिवसांपुर्वी शिल्पाने तिच्या मुलाचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिचा मुलगा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफसोबत एक्शन करताना दिसत आहे. शिल्पा सध्या टिव्ही रियलिटी शो ‘सुपर डांसर 3’ मध्ये शो जज करताना दिसत आहे. २३ जूनला या शोचा फिनाले होणार आहे. हे संपल्यानंतर शिल्पा आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करेल.

शिल्पा शेट्टी सध्या फिटनेससाठी खूपच चर्चेमध्ये असते. ती तिचे फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते आणि लोकांना व्हिडिओद्वारे निरोगी राहण्याचा सल्ला देखील देत असते. तिच्या व्हिडिओला चाहते खूप जास्त लाइक करतात आणि कमेंट करतात.