‘मेंटल है क्या’ च्या सेटवर राजकुमार रावसोबत ‘अशा’ अवतारात स्पॉट झाली कंगना रणौत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘मेंटल है क्या’ चित्रपटाचे आत्तापर्यंत जितके फोटो व्हायरल झाले ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे होते. ज्याला पाहून आपल्या मनामध्ये कधीतरी असा विचार आला असेल की, ‘मेंटल है क्या’? पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सेटवरचा कंगना रणौत आणि राजकुमार रावचा विचित्र फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कंगना क्रिम कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर राजकुमार ब्लॅक कलर आणि शर्ट पॅंटमध्ये दिसत आहे.

चित्रपटाचे निर्देशन प्रकाश कोवेलामुडी आणि निर्माण एकता कपूरने केले आहे. या चित्रपटात राजकुमार राव, कंगना रणौत, अमायरा दस्तूर आणि जिम्मी शेरगिल मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

हा चित्रपट मार्च महिन्यातच प्रदर्शित होणार होता पण काम पुर्ण झाले नसल्यामुळे प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली गेली. आता हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे निर्देशन प्रकाश करणार आहे. या चित्रपटाची कथा कनिका ढिल्लीने लिहली आहे.

या दोन कलाकार व्यतिरिक्त चित्रपटात जिमी शेरगिल आणि अमायरा दस्तूरही दिसणार आहे. चित्रपट प्रोडक्शन हाउसचे काम बालाजी करत आहे. कंगना रणौतबद्दल बोलायचे म्हणले तर, ती या व्यतिरिक्त ‘पंगा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये देखील राजकुमार राव, जाह्नवी कपूर, रूही आफजा दिसणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

गरोदरपणात महिलांना असते ५० टक्के फॉलिक अ‍ॅसिडची गरज 

वजन कमी करताना येणारा अशक्तपणा धोकादायक 

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करा ‘हे’ उपाय 

मणक्यातील वेदना हे असू शकते पॅरालिसिसचेही लक्षण