पैशाच्या लालचेपोटी ‘खुनी’ बनले 12 वी चे 4 मित्र, ‘दोस्ता’लाच संपवून जंगलात पुरलं, कुत्र्यांनी मृतदेहाचे ‘लचके’ तोडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खंडणीसाठी चार विद्यार्थ्यांनी सोबत शिकणाऱ्या एका मित्राचे अपहरण केले आणि जंगलात नेऊन त्याची हत्या केली एवढेच नाही तर त्यांनी त्या मुलाचा मृतदेह देखील पुरून टाकला. चारही जणांनी मृतकाच्या वडिलांना फोन करून आठ लाखांची खंडणी देखील मागितली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर बारावीला असलेल्या या चारही जणांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते. तसेच पोलिसांनी मृत अभिषेकच्या मृतदेह जंगलातून मिळवला आहे. जंगलातील कुत्र्यांनी मुरतदेहाचे लचके तोडल्याने शीर वेगळ्या ठिकणी पडल्याचे आढळून आले.

तिर्वा शहरातील अन्नपूर्णानगर येथील रहिवासी गोपाल राजपूत ठठिया रोडवर लोकांचा इलाज करतात. त्यांचा मुलगा अभिषेक हा कस्बे शहरातील महेंद्र नीलम जनता इंटर कॉलेजमध्ये बारावीचा विद्यार्थी होता. चार फेब्रुवारीला त्याच्याबरोबर शिकत असलेल्या परिसरातील दोन मित्र अ‍ॅडमिट कार्ड घेण्याच्या नावाखाली कॉलेजमध्ये गेले होते, यावेळी त्यांनी अभिषेकचे अपहरण केले आणि जंगलात घेऊन गेले तेथेच त्याचा खून करून मृतदेह पुरून टाकला. मुलगा घरी न आल्यामुळे कुटुंबातील लोक चिंतीत झाले. पाच फेब्रुवारी रोजी वडिलांनी आपला मुलगा अभिषेक गायब असल्याची तक्रार दाखल केली.

10 फेब्रुवारी रोजी दहा वाजता गोपाळ याना एक फोन आला ज्यामध्ये आठ लाख रुपयांची मागणी केली गेली. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. बारा फेब्रुवारीला पोलीस फोनच्या मार्फत अभिषेकच्या खुन्यांपर्यंत पोहचले. चौकशी दरम्यान आठ लाखांच्या खडणीसाठी चारही विद्यार्थ्यांनी अभिषेकचे अपहरण केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी चारही आरोपीना ताब्यात घेतले तसेच मृतदेह पुरल्याच्या ठिकाणाहून अभिषेकचा सांगाडा,बूट आणि हत्या केलेले हत्यार जप्त केले. एसपी अमरेंद्र सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणामध्ये चारही आरोपींसोबत एखाद्या सराईत गुन्हेगार असल्याचा संशय आहे. त्यामुळे पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like