PUC Rate Hike | वाहनांची पीयूसी करण्यासाठी मोजायला लागणार जादा पैसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – PUC Rate Hike | वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी (PUC) करणे बंधनकारक केले आहे. मात्र आता ही चाचणी करण्यासाठी वाहनधारकांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. दरवाढ करत असल्याचे परिवहन विभागाने (Transportation Department) नुकतेच जाहीर केले आहे. तात्काळ ही दरवाढ (PUC Rate Hike) लागू करण्यात आली असून दुचाकीसाठी (Two – Wheeler) 15 रुपये तर चारचाकीसाठी (Four – Wheeler) 35 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी धुरांमुळे वायू प्रदूषणात भर पडते. त्यासाठीच वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहनांची PUC करणे बंधनकारक आहे. जर एखादे नवीन वाहन खरेदी केले असेल तर पीयूसीची मुदत एक वर्षापर्यंत असते त्यानंतर दर 6 महिन्यांनी पीयूसी काढणे बंधनकारक असते. दुचाकीच्या पीयूसीसाठी 35 रुपये आकारले जात होते मात्र नव्या दरवाढीनुसार 50 रुपये द्यावे लागणार आहे. (PUC Rate Hike)

 

पेट्रोलवरील तीन चाकी (Three Wheeler) वाहनाचाही दर 70 रुपयांवरून 100 रुपये, पेट्रोल (Petrol), सीएनजी (CNG), एलपीजी (LPG) वर चालणारे चारचाकी वाहने 90 रुपयांवरून 125 रुपये आणि डिझेलवरील चालणाऱ्या वाहन चाचणीचा दर 110 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आला आहे.

 

Web Title :- PUC Rate Hike | puc centres announce hike in rates across maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा