Pondicherry Floor Test : काँग्रेसला मोठा झटका; पुदुच्चेरीत सरकार कोसळले

नवी दिल्ली : पुदुच्चेरी राज्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुतम सिद्ध करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, नारायणसामी यांना बहुतम सिद्ध करता आले नाही. त्यामुळे पुदुच्चेरीत सत्तेवर असलेले काँग्रेसचे सरकार कोसळले. आता काँग्रेसच्या हातातून आणखी एका राज्याची सत्ता गेली आहे.

पुदुच्चेरीचे नवनियुक्त उपराज्यपाल तमिलिसाई सौदरराजन यांनी मुख्यमंत्री नारायणसावी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. पण ते सिद्ध करू न शकल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. या बहुमत चाचणीपूर्वी म्हणजे सकाळीच नारायणसामी यांनी आपल्याकडे पूर्ण बहुमत असल्याचा दावा केला होता. मात्र, अखेरीस त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करता आले नाही.

आत्तापर्यंत 5 आमदारांचा राजीनामा

काँग्रेस-द्रमुक आघाडीचे बहुमत सिद्ध करण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आले आहे. पुदुच्चेरीत काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायण आणि द्रमुकचे आमदार व्यंकटेशन यांनी काल (रविवार) विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आत्तापर्यंत राजीनामा दिलेल्या आमदारांची संख्या 5 झाली आहे. त्यानंतरच नारायणसामी सरकार संकटात आले होते.

विधानसभेत एकूण 33 जागा

विधानसभेत 33 जागा असून, त्यापैकी 33 सदस्यांची निवड ही निवडणूक प्रक्रियेतून केली जाते. पण उर्वरीत 3 सदस्यांची निवड ही केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जाते.