Puja Khedkar | पूजा खेडकरने ठोठावला हायकोर्टाचा दरवाजा; IAS पद परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा

IAS Puja Khedkar

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Puja Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस (Controversial trainee IAS Officer) पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) धाव घेतली आहे. यूपीएससीने आयएएस पद रद्द केल्याप्रकरणी पूजा खेडकरने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी पूजा खेडकरने केली आहे.

आयएएस पद मिळवण्यासाठी पूजा कायदेशीर लढा देणार आहे. तिने याचिका दाखल करून लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी मागणी केली आहे. पूजा खेडकरने DOPT ला पक्षकार बनवले आहे. रविवारी रात्री पूजा खेडकरने ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. याबाबत आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

पूजा खेडकरचे अनेक घोटाळे समोर आल्यानंतर UPSC ने तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. पण पूजाने मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नव्हते.

तसेच पुणे पोलिसांनी (Pune Police) देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील तिने दखल घेतली नव्हती. दरम्यान, पूजाने दिल्लीच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) अर्ज दाखल केला होता. मात्र दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिला शोधून अटकेची कारवाई करावी लागणार आहे.

वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही क्रिमीलेअर सुविधेचा (Non Creamy Layer Certificate) लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप पूजा खेडकरवर ठेवण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Wagholi Pune Crime News | मुलाच्या हव्यासासाठी विवाहितेचा छळ करुन आत्महत्येस केले प्रवृत्त; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल, वाघोलीतील घटना

Bibvewadi Pune Crime News | कुख्यात तडीपार गुन्हेगार निलेश कुडले याच्यावर वार; बिबवेवाडीतील घटना

Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’

Total
0
Shares
Related Posts
Ajit Pawar To MLA Sanjay Gaikwad | ncp ajit pawar slammed mla sanjay gaikwad for his controversial statement in front of cm eknath shinde

Ajit Pawar To MLA Sanjay Gaikwad | वादग्रस्त विधानावरून मुख्यमंत्र्यांसमोरच शिंदे गटाच्या आमदाराला अजित पवारांनी सुनावले खडेबोल; म्हणाले – ” वाचाळविरांनी आपापल्या मर्यादा… “