विनायक चतुर्थीच्या दिवशी करा ‘या’ मंत्रांचा जप, उजळेल भाग्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या विनायक चतुर्थी आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा, जप आणि तप करण्यात येते. श्री गणेशाला विघ्नहर्ता, लंबोदर, गजानन, गणपती, बाप्पा, गणेश इत्यादी म्हटले जाते. असे म्हटले जाते की, जो व्यक्ती मनोभावे गणपती बाप्पाची पूजा करतो, त्याच्या जीवनातील सर्व दु:ख आणि संकट दूर होतात. सोबतच जीवन मंगलमय होते. धार्मिक शास्त्रानुसार सर्वात अगोदर श्री गणेशाची पूजा केली जाते. विनायक चतुर्थीच्या दिवशी खालील मंत्राचा जप जरूर करा –

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

या मंत्राद्वारे श्रीगणेशाकडे सर्व दुःख दूर करण्याची इच्छा व्यक्त केली जाते. या मंत्राचा अर्थ आहे – हे गणराया, प्रभु! तुम्ही विशालकाल शरीराचे, सहस्त्र सूर्यांच्या समतुल्य महान आहात. तुम्ही माझीसुद्धा सर्व विघ्न दूर करा आणि सर्व बिघडलेली कामे पूर्ण करा. तुमची कृपा माझ्यावर असू द्या. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीची सर्व कामे मार्गी लागतात.

गजाननं भूतगणाधिसेवितं,

कपित्थजम्बूफलचारुभक्षणम

उमासुतं शोकविनाशकारकम्न,

मामि विघ्नेश्वरपादपड्कजम

या मंत्राचा अर्थ आहे – हे उमा पुत्र गणाधिपती गणेशा, दुखहर्ता आपल्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझी सर्व विघन आणि बाधा दूर करा.

कृपा करो गणनाथ

प्रभु-शुभता कर दें साथ।

रिद्धि-सिद्धि शुभ लाभ

प्रभु, सब हैं तेरे पास॥

हे गणराया. पूर्ण करा प्रभु कामना, तुम्हाला वारंवार प्रणाम. या मंत्राद्वारे व्यक्ती श्री गणेशाल शुभ लाभ देण्याची विनंती करतो. जीवनात व्यापक बदलांसाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा जप करा.

ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं हृीं श्रीं गं गणपते

वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।

या मंत्र जपाने व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते. सोबतच शत्रूंचा नाश होतो. या मंत्राचा जप कमीत-कमी 11 वेळा जप करा.