लक्ष्मी मातेच्या ‘या’ 10 मंत्रांचा करा जप, कायम राहील कृपा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते. आज शुक्रवार आहे आणि या दिवशी आई लक्ष्मीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, मां लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. त्यांची पूजा करताना काही मंत्र जप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. असे म्हणतात की. या विशेष मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या संपते, आणि सर्व समस्या दूर होतात.

1. ॐ धनाय नम:
या मंत्राचा जप केल्याने संपत्तीचा लाभ होतो. याचे उच्चारण शूक्रवारी कमळाच्या माळेसोबत केले पाहिजे.

2. धनाय नमो नम:
या मंत्राचा रोज 11 वेळा जाप करावा. यामुळे व्यक्तीची आर्थिक अडचण दूर होते.

3. ओम लक्ष्मी नम:
या मंत्राचा जप केल्यास लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरातच वास करते. तसेच घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. या मंत्राचा जप केवळ चटईवर बसूनचकेला पाहिजे.

4. ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम:
कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा. जर हे केले तर त्या व्यक्तीचे कार्य सफल होते.

5. लक्ष्मी नारायण नम:
या मंत्राचा जप केल्याने वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी येते. हे एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीस प्रोत्साहन देते. तसेच नवरा-बायकोचे नातंही चांगलं राहिलं आहे.

6. पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम्।
लक्ष्मीच्या या मंत्राचा 108 वेळा जप करा. स्फटिकांच्या माळेसोबच त्याचा जप करा. यासह घरात नेहमी अन्न आणि पैसे टिकून राहतात.

7. ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
या मंत्राचा जप करून व्यक्ती यश प्राप्त करते. लक्ष्मीच्या चांदीच्या किंवा अष्ट धातूच्या मूर्तीची पूजा करावी.

8. ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्री सिद्ध लक्ष्म्यै नम:
या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने फायदा होतो. शुक्रवारी आई वैभव लक्ष्मीची पूजा केली जाते. या दरम्यान आपण मंत्र जप करू शकता.

9. ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:
कर्जातून मुक्त व्हायचे असेल तर या मंत्राचा जप करा. यामुळे आर्थिक संकट संपेल.

10. ऊं ह्रीं त्रिं हुं फट
कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करावा. यामुळे लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.