Pulses Benefits | डाळी-कडधान्यं खाण्याने वाढते वय 10 वर्षांनी, अमेरिकन शास्त्रज्ञांचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pulses Benefits | प्रत्येकाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असते. पण प्रत्येकाला दीर्घायुष्य जगण्यासाठी काय खावे हे माहीत नसते. दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शारीरिकदृष्ट्या उत्साही आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. पौष्टिक आहारामुळे सर्व प्रकारचे आजार टाळता येतात (Health Benefits Of Pulses). मात्र, महागडे पदार्थ म्हणजेच पौष्टिक आहार, असे अजिबात नाही. आज अशा काही आरोग्यदायी पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं आयुष्य १० वर्षांनी वाढायला मदत होईल (Pulses Benefits).

 

संशोधकांच्या मते, जे लोक दररोज १ वाटी डाळ, संपूर्ण धान्य, काजू खातात. ते इतरांपेक्षा १० वर्षे जास्त जगतात. त्याच वेळी, लाल आणि प्रक्रिया केलेले मांस शक्य तितके टाळावे (Avoid Red And Processed Meat). वृद्धापकाळात आहारातील बदलही लाभदायक ठरतील. म्हातारपणीही आहारात बदल केला तर त्याचाही फायदा आरोग्याला होऊ शकतो, असं या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. वयाच्या ६० व्या वर्षीही स्त्री-पुरुषांनी आहार बदलला तर ते ८.४ वर्षांपर्यंत जगू शकतात. अगदी ८० च्या वयातील लोकही आहारात बदल करून त्यांचे आयुष्य ३ वर्षांनी वाढवू शकतात (Pulses Benefits).

 

वेस्टर्न डाएटमध्ये या गोष्टी नाही (Western Diet Does Not Have These Things) –
अमेरिकन संशोधकांना असे आढळले आहे की, अमेरिकन माणसाच्या आहारात क्वचितच डाळ-भाजी, फळे आणि शेंगदाण्यांचा समावेश असायचा. त्याऐवजी डेअरी, साखरयुक्त पेय आणि पदार्थांचे सेवन अमेरिकन करायचे.

 

देशी पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर का आहेत (Why Desi Foods Beneficial For Health) ? –
डाळी आणि कडधान्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि बर्‍याच खनिजांचे भरपूर प्रमाण असते. यामुळे पाचनप्रक्रियाही चांगली राहते. शिवाय हृदयरोग, मज्जातंतूंच्या अडथळ्यापासून बचाव करण्यासाठीही मदत होते.

 

सुकामेवा (Dry Fruits) –
भिजवलेले बदाम, काजू, अक्रोड, अंजीर, खजूर, मनुका यासारख्या सुक्यामेव्यामध्ये फॅटी अ‍ॅसिड्स असतात. त्यामुळे शरीराची जळजळ कमी होते. त्याचबरोबर त्यात आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे अपचन, वेदना, सांधेदुखी, संधिवात, संधिवाताचे आजार, हृदयरोग यांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

धान्य (Grains) –
जवस, ब्राऊन राईस, ट्रिटिकेल, ज्वारी, बाजरी, क्विनोआ आणि ओटमील अशा संपूर्ण धान्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.
यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याबरोबरच मधुमेह, हार्ट अटॅक, स्ट्रोक, कॅन्सरपासून बचाव होईल.

 

पालेभाज्या (Vegetables) –
प्रत्येकाने रोज किमान ५ वाट्या हिरव्या भाज्या खाव्यात. आपण कोशिंबीर म्हणून देखील घेऊ शकतात.
पालक, काळे, पत्ता कोबी, ब्रोकोली, हिरव्या भाज्या, भेंडी, बीन्स, भोपळा, यासारख्या भाज्या आपल्याला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यास मदत करतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Pulses Benefits | if you want to live 10 years more than your age then eat this 3 things

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arthritis Causes And Prevention | ‘या’ गोष्टींमुळे संधिवाताच्या वेदना वाढू शकतात, तुम्ही ‘या’ गोष्टींचं अधिक सेवन तर करत नाहीत ना?

 

Gujarat Sagar Salt Factory Wall Collapse | ‘सागर सॉल्ट’ची भिंत कोसळून मोठी दुर्घटना; 12 मजुरांचा मृत्यू

 

Soaked Dry Fruits Benefits | उन्हाळ्यात भिजलेले ड्रायफ्रुट्स खा, जाणून घ्या होणारे फायदे