देशाला हादरून सोडणारा ‘पुलवामा’ हल्ला, 9 महिन्यानंतर समोर आल्या काही ‘वस्तुस्थिती’ला धरून असलेल्या ‘गोष्टी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाला हदरवून टाकणाऱ्या पुलवामा हल्ल्याचा अहवाल नऊ महिने झाले तरी सादर होऊ शकला नाही. या हल्ल्यातील आरोपी असलेले अनेक मोठे आरोपी मारले गेले. दोन मुख्य दहशतवादी मुदसर खान आणि सज्जाद भट्ट या वर्षी मारले गेले आहेत. या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपावण्यात आला आहे. सूत्रानुसार एनआयए या प्रकरणी अहवाल सादर करु शकेल.

14 फेब्रुवारीला दहशतवादी आदिल अहमदने पुलवामा सीआरपीएफच्या वाहनावर आपली कार नेऊन धडकवली होती. कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक होती. यात 44 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद यांनी घेतली होती. या हल्ल्यात सहभागी सर्व दहशतवादी मारले गेले.

यामुळे अजून ही माहिती समोर आली नाही की या हल्ल्याची योग्य माहिती काय? या हल्ल्याची रुपरेखा तर कळाली आहे परंतु व्यक्तिगत स्वरुपात यात कोणत्या व्यक्तीची काय भूमिका होती हे अजून स्पष्ट झाले नाही.

सूत्राच्या मते तपास करणाऱ्या एनआयएने या हल्ल्यातील अनेक जणांची ओळख पटवली आहे. सात ते आठ जणांची ओळख पटली आहे. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकिस्तानामध्ये असलेले दहशतवाद्यांच्या भूमिकेवर एनआयए काम करत आहे. जेणे करुन पाकिस्तानची यातील भूमिका सर्वांनं समोर आणता येईल.

याच प्रकारे 2016 मध्ये पठानकोटमध्ये हल्ला करणारे चार दहशतवादी मारल्या गेले होते. अनेक महिन्यानंतर या प्रकरणाची चार्जशीट सादर करण्यात आली, ज्यात जैशचा दहशतवादी अजहरसह तिघांना मुख्य आरोपी निश्चित करण्यात आले होते. तपासात यंत्रणांना 90 दिवसात चार्जशिट दाखल करावी लागते. परंतु या प्रकरणात आरोपींचा मृत्यू झाला तर अतिरिक्त वेळ मिळू शकतो.

काही महिन्यापूर्वी राज्यसभेत सरकार सांगितले की हा हल्लामागे गुप्तचर यंत्रणांच्या बेजबाबदारपणा नव्हता. प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने प्रत्येक पैलूवर तपास केला आहे. या हल्ल्यातील कारचा शोध देखील घेतला आहे. ही कार सज्जाद भटची होती. या कारची पहिल्यांदा 2011 मध्ये विक्री झाली होती. यानंतर या कारची अनेकदा विक्री झाली. पुलवामा हल्ल्याच्या चार दिवस आधी कारची विक्री झाली होती कारमध्ये स्फोटक ठेवणारा मुदसिर खान मार्च 2019 मध्ये मारला गेला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/