सिने कामगार संघटनेकडून पाक कलाकारांची ‘ही’ सुविधा रद्द करण्याची मागणी 

मुंबई : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकारांना भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये बंदी घालण्यात आली होती. याप्रकरणी AICWA ने नोटीस जाहीर केले होते. आता या हल्ल्याचा निषेध म्हणून सिने कामगार संघटनेने पाकिस्तानी कलाकारांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात सिने कामगार संघटनेने परराष्ट्र मंत्रालयाला एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पाकिस्तानी कलाकारांचे व्हिसा रद्द करण्याची मागणी केली आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० हून अधिकजवान शहीद झाले होते. या पार्श्वभुमीवर सिने कामगार संघटनेने ही ठोस भूमिका घेतली आहे.

पाकिस्तान विरोधात ठोस पावलं उचलत बॉलीवूडने अनेक निर्णय घेतले आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणल्यानंतर म्युजिक कंपन्यांनी त्यांची गाणी हटवली एवढेच नाही तर सलमान खानने त्याच्या ‘नोटबुक’ चित्रपटातून आतिफ असलमच गाणं हटवलं आहे. तसेच बॉलिवूडचे काही चित्रपट पाकिस्तानात रिलीज होणार  नाही.