अजय देवगणचा ‘हा’ पिक्चर पाकिस्तानमध्ये रिलीज होणार नाही

मुंबई : वृत्तसंस्था – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अजय देवगणने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’येत्या २२ फेबु्रवारीला रिलीज होणार आहे. याचदरम्यान अजय देवगणने एक ट्वीट करत, ‘टोटल धमाल’ पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याची माहिती दिली आहे. ‘सद्यस्थिती बघता, ‘टोटल धमाल’च्या टीमने आपला चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शिन न करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे अजयने ट्वीटरवर जाहिर केले. या ट्विटआधी अजयने पुलवामा हल्ल्याचा निषेध करत, संताप व्यक्त केला होता.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४४ जवान शहिद झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाचे वातावरण आहे. अशात आपला चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा ‘टोटल धमाल’ टीमचा निर्णय कौतुकास्पद म्हणावा लागेल.

‘टोटल धमाल’ आधी २००७ ‘धमाल’ आणि २०११मध्ये ‘डबल धमाल’ रिलीज झाला होता. या दोन्ही चित्रपटात तगडी स्टार कास्ट होती आणि हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिस हिट ठरले होते. आता ‘टोटल धमाल’ चित्रपटातही अजयशिवाय अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी यांसारखे कलाकार दिसून येणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशन मध्ये बिझी आहे.