पुलवामाला 1 वर्ष ! शहीद जवानाच्या पत्नीचं ‘आवाहन’, आता तरी सरकार ऐकून घेईल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष होत आहे, परंतु त्यात शहीद झालेल्या जवानांना सरकारकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. केंद्र सरकारने फक्त आश्वासन दिले परंतु अजून ती पूर्ण केली नाहीत. प्रशासकीय कामांमुळे शहीदांच्या नातेवाईकांना अनेकदा अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत.

अशीच कथा आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (सीआरपीएफ)चे जवान कौशल कुमार रावत यांची. कौशल कुमार रावत 14 फेब्रुवारी 2019 ला त्या बसमध्ये बसले होते ज्यावर दहशतवादी हल्ला झाला होता.

केंद्र आणि राज्य सरकारकडून शहीदांसाठी केले गेलेले देण्यात आलेले आश्वासने अपर्याप्त ठरत आहेत. कौशल कुमार रावत आग्राचे राहिवासी आहेत. शहीद कौशल रावत यांच्या आई सुधा रावत आजही मुलाच्या आठवणीत बोलताना रडतात. सरकारने यांचे अश्रू पुसायचे सोडून ते या आईला अधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारयला भाग पाडत आहे.

सुधा रावत म्हणाल्या की त्यांना ना केंद्र सरकारकडून मदत मिळाली ना एखाद्या सामाजिक संघटनेकडून. कोणताही लोकप्रतिनिधी विचारपूस करण्यासाठी आला नाही. त्या म्हणाल्या की जेव्हा मुलाची अंतिम यात्रा निघाली होती तेव्हा मोठे मोठे अधिकारी, नेता आले होते. सर्वांनी मोठंमोठी आश्वासने दिली, परंतु वर्ष निघून गेले पण अद्याप कोणतेही आश्वसान पूर्ण झाले नाही.

शहीद कौशल कुमार रावत यांचे कुटूंब आता गुरुग्रामच्या मानेसर भागात राहते. त्यांच्या पत्नी ममता म्हणाल्या की सरकारी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आमची सहनशीलता संपली आहे. शहीद जवानाच्या मुलाने सांगितले की, योगी सरकारने 25 लाख देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. आमचे पैसे अधिकारी रोखून ठेवत आहेत.

सुधा रावत म्हणाल्या की त्यांनी आग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी विनंती केली आहे. परंतु त्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही. शहीद जवानाचे चुलत भाऊ प्रकाश रावत म्हणाले की जिल्हा प्रशासनाने शहीद स्मारक बनवण्याची घोषणा केली होती. परंतु ते अद्याप झाले नाही. शहीदांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही ग्राम पंचायतीच्या मदतीने स्मारक तयार करु.

सत्य प्रकाश रावत म्हणाले की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 लाख रुपये मदतीची घोषणा केली होती. अद्याप ती पूर्ण झाली नाही. कोणाकडूनही कोणतीही मदत मिळाली नाही. घरातील परिस्थिती खराब असल्याने मुलांच्या शिक्षणावर देखील परिणाम होत आहे.

सत्य प्रकाश रावत म्हणाले की शहीद कौशल कुमार रावत यांच्या नातेवाईकांनी सांगितले की मुलांच्या नोकरीपासून तर सरकारी मदतीसाठी सीआरपीएफचे अधिकारीच धावपळ करत आहेत. रिलायन्स फाऊंडेशनने देखील शहीदांच्या मुलांचे फॉर्म भरुन घेतले आहेत परंतु अद्याप मदत दिली नाही.