सलमानने ‘या’ चित्रपटातून हटवले आतिफ असलमचे गाणे  

मुंबई : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात भारताचे ४० जवान शहिद झाले. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उठले आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला मदत केली. आता या हल्ल्याच्या निषेधार्थ म्हणून बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने एक निर्णय घेतला आहे. सलमानने त्याच्या आगामी ‘नोटबुक’ चित्रपटातून पाकिस्तानी गायक आतिफअसलमच गाणं हटवलं आहे.

सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ मध्ये आतिफ असलमने गायलेले एक गाणे होते. हे गाणे गाळण्याचा आदेश सलमानने दिला आहे. आता या गाण्याचे पुन्हा नव्याने रेकॉर्डिंग होणार आहे. ‘नोटबुक’ चित्रपटातून दोन नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन आणि जहीर इक्बाल हे दोन कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. प्रनूतन ही अभिनेत्री नूतन यांची नात आहे. येत्या मार्चमध्ये  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तसेच या हल्ल्याचा निषेधार्थ म्हणून फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणली आहे. आणि एका म्युजिक कंपनीने देखिल पाकिस्तानी गायकांची गाणी युट्युब वरून हटवली आहे. यात पाकिस्तानी गायक आतिफ असलम आणि राहत फतेह अली खान अशा दोन पाकिस्तानी गायकांचा समावेश आहे.

Loading...
You might also like