‘पुलवामा’मध्ये भारतीय लष्कराला मोठं यश, ‘जैश’च्या मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्याचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलाच्या आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जो जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित होता. एका वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये अबु सैफुल्ला आणि अबु कासिम या नावाने वावरत होता. अधिकाऱ्याने सांगितले की मारल्या गेलेल्या दहशतवाद्यावर दोन नागरिकांचे अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच विशेष पोलीस आधिकारी आणि कामगारांना खोऱ्याबाहेर जाण्यास धमकावल्याचा आरोप देखील त्याच्यावर होता.

त्यांनी सांगितले की जुलै 2013 मध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर चकमकीत मारलेला गेलेला जेईएमचा स्वयंभू प्रमुख पाकिस्तानी कमांडर कारी यासिरचा सहकारी होता. अबु सैफुल्ला मंगळवारी सकाळी पुलवामामध्ये अवंतिपुरा भागात जैंत्राग गावात तपासादरम्यान स्थानिक सहकाऱ्यांच्या घरात असल्याचे कळाले होते.

दोन जखमी जवानांनी रुग्णालयात जीव सोडला –
अधिकाऱ्याने सांगितले की गुप्त सुत्रांनुसार हे अभियान राबवले गेले होते आणि दहशतवाद्यांच्या तपासात असताना चकमक झाली. यात संयुक्त दलाचे 50 तर राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची 185 बटालियन सहभागी होती. या चकमकीत शिपाई राहुल रांसवाल आणि स्थानिक पोलीस एसपीओ शाहबाद अहमद यांना गोळी लागली. त्यांना श्रीनगरच्या सैन्यदलाच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांनी तेथे जीव सोडला.

1 दहशतवादी फरार –
अधिकाऱ्याने सांगितले की जखमी जवानांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना याचा फायदा घेऊन दहशतवादी तेथून फरार झाले. नागंदरगावच्या जंगलात ते असल्याची माहिती मिळाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चकमक झाली आणि या दरम्यान मोस्ट वॉन्टेड अबु सैफुल्ला मारला गेला, अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या इतर साथीदारांना मारण्यात यश आले.

ते म्हणाले की अबु सैफुल्ला दीड वर्षापासून अवंतिपुराच्या त्राल आणि ख्रेव भागात सक्रिय होते. ते मारल्या गेलेला जेईएम प्रमुख कारी यासिरचे मर्जीतले होते. मागील वर्षी तेथे दोन नागरिकांचे अब्दुल कादिर कोहली आणि मंजूर अहमदचे अपहरण आणि हत्या करणे तसेच दुकानदार नसीर अहमद गनीला जखमी करण्याच्या प्रकरणातील आरोपी होता. अधिकाऱ्याने सांगितले की सैफुल्ला एसपीओला आपली नोकरी सोडावी लागली होती आणि स्थानिक मजदूरांना खोरे सोडून जाण्यासाठी धमक्या देखील त्याने दिल्या होत्या.

फेसबुक पेज लाईक करा –