गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याकडून जवानांसाठी १ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांस मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे ५ लाख रुपये तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तर्फे तब्बल १ कोटी रुपये देण्यात येणार आहे. २४ एप्रिल २०१९ रोजी ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार वितरण सोहोळ्यादरम्यान षण्मुखानंद सभागृह,सायन पूर्व येथे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांकडून भारतीय सैनिकांस घोषित करण्यात आलेले १ कोटी ५ लाख रुपये भारतीय सैन्याच्या स्वाधीन केले जातील. संगीतकार ह्दयनाथ मंगेशकर यांनी ही घोषणा केली.

भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला 

१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे भारतातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय लष्करावर झालेल्या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. ह्या हल्ल्यामुळे देशात सर्वत्र संतप्त वातावरण पसरलेले असून या जवानांच्या कुटुंबांचे अपरिमित नुकसान झाले आहे. दिवस-रात्र एक करून सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी संपूर्ण भारत एकत्र येऊन त्यांच्या पाठिशी खंभीरपणे उभा आहे.

स्वत:चा त्याग करून आपल्या कल्याणासाठी सीमेवर सतत सज्ज असणाऱ्या जवानांना आम्ही सलाम करतो. हे आमचे एक विनम्र योगदान आहे, असे  हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.