पुलवामामध्ये शहीद झालेल्या रोहिताश यांना विसरलं सरकार, भाऊ म्हणाला – ‘निवडणूकीत वापर करणार होते नेते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 27 वर्षीय शहीद रोहिताश लांबा यांच्या गावी त्यांच्या शहीद होण्याची आज देखील आठवण काढली जाते. जयपूरच्या शाहपुरा येथील हा वीर 1 वर्षांपूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशासाठी शहीद झाला. त्यांच्या कुटूंबाला आणि गावाला त्यांचा गर्व आहे परंतु राज्य आणि केंद्र सरकारला मात्र त्यांचा विसर पडला.

कुटूंबातील लोकांचा आरोप आहे की शहीद झाल्यानंतर लांबा यांच्या कुटूंबाची विचारपूस केली, आश्वासनं दिली मात्र त्यातील एकही आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. रोहिताश लांबा यांच्या वडीलांनी सांगितले की पुलवामा हल्ल्याला जबाबदार होते, त्यांना शिक्षा मिळाली का नाही हे ही त्यांना माहित नाही. ते म्हणाले की त्यांना आज तागायत सांगण्यात आले नाही की हे हल्लेखोर कोण होते आणि त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे की नाही.

माहित नाही हल्ल्याला जबाबदार –
लांबा यांचे वडील म्हणाले की, कुटूंबाला राज्य आणि केंद्र सरकारकडून जवळपास दीड कोटी रुपयांची मदत मिळाली आहे परंतु ते दहशतवादी हल्ल्याच्या तपासावर संतुष्ट नाही. कुटूंबाच्या मनात ही देखील शंका आहे की भारतावर एवढा मोठा हल्ला झाला ते झाला तरी कसा आणि जर गुप्तचर माहितीची यात कमी पडली तर त्यासाठी कोणाला जबाबदार का धरण्यात आले नाही.

भावाचा आरोप, नेता देत होते लोकसभा निवडणूकीचे तिकिट –
रोहिताश लांबा यांच्या लहान भावाने जितेंद्र लांबा यांनी आरोप लावला की त्यांना नोकरी देण्याचा आश्वासन देण्यात आले होते परंतू राज्य सरकारच्या मंत्र्यांकडे चकरा मारुन देखील त्यांना नोकरी मिळाली नाही. एवढेच नाही तर रोहिताश लांबा यांच्या आठवणीत कोणत्याही शाळेला किंवा रस्त्याला नाव देण्यात आले नाही.

जितेंद्र लांबा म्हणाले की मला एका मंत्र्याकडून दुसऱ्या मंत्र्याकडे हेलपाटे मारावे लागत होते, माझ्या भावाच्या शहीद होण्यानंतर मला नोकरी देणार असे अश्वासन देण्यात आले होते परंतु मला अद्याप नोकरी मिळाली नाही. मागील वर्षी लोकसभा निवडणूकीपूर्वी मला दोनवेळा बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूकीच्या तिकिटासाठी विचारणा करण्यात आली. तेव्हाच मी म्हणालो होतो की नोकरी द्या, परंतु अद्याप मला नोकरी देण्यात आली नाही.

मुलाला सैन्यात भरती करु इच्छित आहे आई –
रोहिताश लांबा यांना शहीद होऊन जवळपास दीडवर्ष उलटून गेली. रोहितास लांबा जेव्हा शहीद झाले तेव्हा त्यांचे मुलं 2 महिन्यांचे होते. लांबा यांच्या पत्नी मंजू जाट म्हणाल्या की मला वाटते की माझे मुलं मोठे होऊन सैन्यात भरती व्हावे. तर लांबा यांच्या आईला आपल्या मुलाच्या शहीद होण्याच्या आठवणीने रडू आवरत नव्हते.