‘सिस्टीम’ समोर हारलेल्या पुलवामामध्ये शहीद झालेल्यांच्या कुटूंबियांनी दिली उपोषाणाची धमकी, वर्षभरात कोणतीही मदत नाही मिळाली

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या दिवशी बरोबर एका वर्षपूर्वी सर्व देश व्हेलेंटाईन दिवस साजरा करत असताना दुपारी साढे तीनच्या सुमारास सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले होते. हा भारतीय जवानांवरील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. यानंतर संपूर्ण देशाने शहिदांच्या प्रति आपली आदरांजली व्यक्त केली होती. शहिदांच्या कुटुंबियांना मोठी मदत दिली जाईल अशी घोषणा करून त्यावेळी मते देखील मागण्यात आली होती. मात्र त्यानंतर याचा विसर आश्वासनकर्त्यांना पडताना दिसत आहे.

प्रयागराज येथील शहीद महेश यादव यांच्या कुटुंबियांना अद्याप कोणत्याही प्रकारची पेंशन मिळालेली नाही किंवा कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी देखील दिली गेलेली नाही शहिदांची मुले अजूनही हजारो रुपये देऊन शिकत आहेत एकूणच कोणत्याही प्रकारची मदत शहिदांना देण्यात आलेली नाही.

वडील अजूनही दुःखी
महेशच्या कुटुंबीयांना अजूनही त्याची कमतरता जाणवते असे असूनही महेशचे वडील कुटुंबातील इतर मुलांना सैन्यात भरती करणार असल्याचे सांगतात मात्र कोणतीही मदत न मिळाल्याने ते अजूनही उदास आणि दुःखी असल्याचे समजते. एवढेच नाही तर शहिदांचे कुटुंबीय या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुढील महिन्यात लखनऊ येथे उपोषण करणार असल्याचे देखील सांगत आहेत.

महेश यादव अठारहवीं बटालियनमध्ये काँस्टेबल होते
शहीद झालेले महेश यादव हे आपल्या घरातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. ते अठारहवीं बटालियनमध्ये काँस्टेबल म्हणून कार्यरत होते. महेशच्या शहीद होण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.

शहीद कुटूंबियांना देण्यात आली होती ही आश्वासने
कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी दिली जाईल.
हायवे पासून घरापर्यंत पक्का रस्ता
घराच्या शेजारी हपसा बसवला जाईल.
शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण, पत्नीला पेंशन दिली जाईल.
शेतीसाठी दिढ एकर जमीन दिली जाईल.
शहीद महेशचा पुतळा देखील गावात लावला जाईल.

अशा प्रकारचे अनेक वादे कुटुंबियांसोबत करण्यात आले होते मात्र अकरा लाखाची मदत दिल्यानंतर यातील एकही अश्वसन पूर्ण न झाल्याचे समजते.

प्रत्येक जण जबाबदारी टाळत आहे
महेशच्या कुटुंबीयांनी अनेकदा मदतीसाठी सरकारी कार्यालयात चौकशी केली परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. एव्हडेच काय पण नंतर नंतर कोणता नेताही त्यांच्याकडे फिरकला नाही, भेटलेले अधिकारी देखील आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

15 मार्च पासून सुरु करणार उपोषण
सिस्टिमला वैतागलेले महेशचे दुःखी वडील राजकुमार यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबाने आम्ही भीक मागत नसून केलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सांगत असल्याचे म्हंटले आहे. तसेच जर जबाबदार व्यक्तींनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर 15 मार्चला लखनऊ येथील सरकारी कार्यलयाबाहेर कुटुंबीय उपोषणाला बसणार आहेत.