40 KG विस्फोटक – सुरक्षा दल ‘निशाणा’, IG नं सांगितलं पुलवामामध्ये काय होता आतंकवाद्यांचा प्लॅन

पुलवामा : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी एक मोठ्या दशहतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला. येथे एका गाडीत मोठ्या प्रेमाणात आयईडी होते, जे सुरक्षा दलांनी ट्रॅक करून डिफ्यूज केले. याच प्रकरणावर जम्मू-काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी मीडियाशी बोलताना दावा केला की, या हल्ल्याद्वारे सुरक्षादलांना निशाणा बनवण्याचा कट होता.

जम्मू काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, मागच्या आठवड्यापासून खबर होती की, जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन एकत्रितपणे अशाप्रकारचा हल्ला करू शकतात, ज्यानंतर आम्ही सतत ट्रॅकिंग करण्यास सुरूवात केली. काल सायंकाळी पोलिस, लष्कर, सीआरपीएफच्या मदतीने आम्ही याचा पाठलाग केला. आम्ही नाक्यावर वॉर्निंग फायरिंग केली, परंतु दशहतवाद्यांनी गाडी थांबवली नाही.

विजय कुमार यांच्यानुसार, पुढील नाक्यावर सुद्धा आम्ही फायरिंग केली परंतु, अंधार होता, यामुळे ते पळून गेले. यानंतर आम्ही ती गाडी जप्त केली आणि तिची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात आयईडी मिळाले. आमच्या टीमने आयईडी तपासले आणि ते डिफ्यूज केले. यापाठीमागे एका मोठ्या हल्ल्याचा कट होता, जो उधळून लावण्यात आला.

विजय कुमार यांनी सांगितले की, हे लोक मागील अनेक दिवसांपासून कट कारस्थानासाठी प्रयत्न करत होते, परंतु ते करू शकले नव्हते. यामुळे आता त्यांचा प्रयत्न सुरू होता. त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ दिला नाही. हे लोक कोणत्याही पोलीस, सुरक्षादलाच्या टीमला टार्गेट करू शकत होते. गाडीत सुमारे 40-45 किलो पर्यंत स्फोटके होती, जी डिफ्यूज करण्यात आली.

गुरुवारी पुलवामा जिल्ह्यात रजपुरा रोडजवळ एका सँट्रो कार जप्त करण्यात आली, जिच्यामध्ये सुमारे 40 किलोपर्यंत स्फोटके होती. गुरुवारी सकाळी याच ठिकाणी बॉम्ब स्क्वॉडला बोलावून आयईडी डिफ्यूज केले गेले. जेव्हा ते डिफ्यूज करण्यात येत होते तेव्हा कारमध्ये बॉम्बचा स्फोट झाला आणि त्याचा धूर 50 फूट वर गेला होता. यादरम्यान आजूबाजूचा परिसरात रिकामा करण्यात आला होता.

मागच्या वर्षी सुद्धा पुलवामामध्ये अशाच प्रकारचा हल्ला झाला होता, तेव्हा सुद्धा एक दहशतवादी गाडीत स्फोटके घेऊन सुरक्षादलाच्या ताफ्यात घुसला होता. तेव्हा त्या दशहतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 45 जवान शहीद झाले होते.