गुप्‍तचर यंत्रणाच्या चुकीमुळं झाला पुलवामा हल्‍ला, CRPF च्या अंतर्गत अहवालामध्ये मान्य केल्या ‘कमतरता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. 14 फेब्रुवारी रोजी झालेला हा हल्ला भारताच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याची माहिती समोर आली आहे. सीआरपीएफच्या अंतर्गत रिपोर्टमध्ये हि माहिती सांगण्यात आली आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शाहिद झाले होते. मात्र आता या रिपोर्टनंतर केंद्रीय गृहमंत्रालय आणि सीआरपीएफच्या रिपोर्टमध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये गुप्तचर यंत्रणा यामध्ये दोषी नसल्याचे सांगण्यात आले होते.

या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि, स्फोटकांनी हल्ला होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत होती, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा गाडीने हल्ला होईल, याची कल्पना कुणी केली नव्हती.

गृह मंत्रालयाने काय म्हटले होते –

गृह मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले होते कि, मागील तीन दशकांपासून सुरु असलेल्या या दहशतवादाला मोठ्या प्रमाणात आवर घालण्यात यश आले असून मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे. त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणा समन्वय राखून काम करत असतात. त्याचबरोबर या हल्ल्यातील आरोपींची देखील ओळख पटली आहे.

सीआरपीएफच्या रिपोर्टमध्ये काय –

सीआरपीएफच्या रिपोर्टमध्ये या ताफ़्याच्या लांबीवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या ताफ्यात एकूण 78 वाहने होती. यामधून 2547 जवान जम्मूकडून श्रीनगरच्या दिशेने रवाना झाले होते. त्यामुळे लांबून देखील हा ताफा ओळखला जाऊ शकत होता आणि महत्वाची माहिती देखील लीक झाली. त्याचबरोबर या वाहनांच्या प्रवासादरम्यान नागरिकांच्या वाहनांना जाण्यास देणे सीआरपीएफला महाग पडले. त्याचबरोबर ताफ्याची लांबी देखील यासाठी कारणीभूत होती.

दुपारी 3.30 वाजता HR 49F 0637 of 76 या बसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. हि बस या ताफ्यात 5 व्या क्रमांकावर होती. नियमांनुसार प्रत्येक चार गाड्यांमध्ये विशिष्ट अंतर असायला हवे. यानुसार सर्व सूचनांचे पालन करण्यात आले होते. यामुळेच पाचव्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये एक जवान हि गाडी अडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. 15 पानांचा हा अहवाल सीआरपीएफच्या अधीक्षकांना मे महिन्यातच पाठविण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –