पुलवामा घटना : ‘अब इन कुत्तों की ‘कब्र’ खोदिए…’ : कुमार विश्वास 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले आहेत. या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल नेटवर्किंग साईट्स मधून देखील मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला जात आहे. अनेकजण या घटनेचा बदला घेण्यात यावा अशी मते मांडत आहेत. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. असे असताना कुमार विश्वास यांनी या हल्ल्यावरून केल्या जाणाऱ्या राजकारणाचा कवितेच्या माध्यमातून निषेध केला आहे.

‘सियासतदानों, मत बार-बार देश का “सब्र” खोदिए, 

अब इन कुत्तों की “कब्र” खोदिए..बस’

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील विशेष संदेश आपल्या ट्विटच्या माध्यमातून कुमार विश्वास यांनी दिला आहे. संपूर्ण देश मोदी आणि देशाच्या जवानांच्या सोबत आहे. आतल्या बाहेरच्या सर्व शत्रुंना मारा असा संदेश त्यांनी आपल्या ट्विटरमधून दिला

आदरणीय मोदीजी, पूरा देश आपके साथ खड़ा है !

बाहर-भीतर के ऐसे सारे दुश्मनों को घुसकर मारिए !
सियारों का झुँड शांतिमंत्र नहीं समझता !

कुत्तों को खीर खिलाना बंद करिए ! बस…

आशा कवितेच्या ओळी त्यांनी  ट्विटरच्या माध्यमातून ट्विट केल्या आहेत.  त्यांची ही कविता व्हायरल होत आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर आज तातडीने केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि तिन्ही दलाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. या बैठकीत पुलवामा हल्ल्यासंदर्भात चर्चा आणि याचे प्रत्युत्तर कसे द्यायचे याबाबत चर्चा झाली.

दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही
या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी सपर्क साधला यावेळी बोलताना ते म्हणाले, “पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मी आदरांजली वाहतो. शहीद कुटुंबाच्या दु:खात आम्ही सर्वजण सामिल आहोत. या हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होताना दिसत आहे. लोकांचे रक्त खवळत आहे. या हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला  मोजावी लागणार आहे. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला जाईल. भारत याचे चोख प्रत्युत्तर देईल. यातील एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही. या हल्ल्यानंतरही देश एकजूट आहे, फक्त या गोष्टीचे कोणी राजकारण करू नका. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सैन्य दलाला पूर्ण स्वातंत्र्य दिले जाणार आहे. पर्ण देशाने दहशतवादाविरोधी एकत्र लढा द्यायला हवा. शिवाय आता दहशतवादाविरोधी कारवाईला वेग येईल. दहशतवाद्यांची गय केली जाणार नाही.”

पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला जाणार
दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली याबाबत बोलताना म्हणाले की, “व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला जाईल सीसीएसच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. भारताकडून राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानला एकटं पाडलं जाणार आहे. या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. दहशतवादी कधीही विसरणार नाहीत असा धडा त्यांना शिकवला जाईल.”