सैन्याच्या नावाने फिरणारा तो व्हाट्सअ‍ॅप मॅसेज fake 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवान म्हटले की, लोक जरा हळवेच होतात. जवान जर देशाच्या सीमेवर संरक्षण करीत असताना एखादा हल्ला झाला, तर व्हाट्सअ‍ॅप मॅसेजच्या अफवांना उधाण येते. तसाच एक व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज व्हायरल झाला आहे. तो मॅसेज पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला आहे. या मॅसेजमध्ये असे म्हटले आहे की, भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन मॅसेजदुवारे करण्यात आले आहे. या मॅसेजमध्ये दिल्लीतल्या साऊथ एक्सटेंशनमधील सिंडिकेट बँकेत सैनिक कल्याण निधी नावाने खाते उघडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये खाते क्रमांक- ९०५५२०१०१६५९१५ हा खाते क्रमांक देण्यात आला आहे. हे खाते अभिनेता अक्षय कुमारच्या सूचनेनुसार उघडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एक रुपयापासून कितीही मदत करण्याचे आवाहन या मॅसेजमध्ये करण्यात आले आहे. जेव्हा याची माहिती लष्कराच्या माहिती जनसंपर्क खात्याला मिळाली. तेव्हा त्यांनी हे खाते बोगस असल्याचे सांगितले आहे.

बँक खाते लष्कराशी किंवा सरकारशी संबंधित नाही. त्यामुळे हे खाते कुणाचे आहे. हा लोकांच्या भावनांशी खेळ आहे की ? लोकांना लुटण्याचा प्रयत्न आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याअगोदर २०१६ मध्ये जेव्हा उरीतल्या लष्करी तळावर हल्ला झाला. त्यावेळीही असाच मॅसेज व्हायरल झाला होता. पुलवामातील हल्ल्यानंतर हा मॅसेज वेगाने व्हायरल झाला. पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झालेत. हे जवान केंद्रीय गृहमंत्रालयाशी संबंधित आहेत. त्यामुळे या व्हायरल मॅसेजमधील खोटेपणा  उघड झाला आहे.

सोशल मीडियावर जे बँक खाते देण्यात आले आहे. ते सैनिक कल्याण निधीचे देण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाशी त्याचा संबंध नाही. त्यामुळे असे मॅसेज आल्यावर त्यांची चिकित्सा करणे कधीही योग्य आहे. सोशल मीडियात भावनांचा बाजार मांडला जातो. सैनिक कल्याण निधीच्या फसव्या मॅसेजच्या माध्यमातूनही भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे.