Pulwama terror attack : फारुख अब्दुल्ला यांनी केले ‘हे’ वादग्रस्त विधान 

जम्मू काश्मीर : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्यात ४४ जवान शाहिद झाले आहेत. दरम्यान  या संदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या दहशदवादी हल्यात फक्त पाकिस्तान जबाबदार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर  २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले आहेत. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दरम्यान यासंदर्भांत अंवतीपुरमधील हल्ल्याबाबत मला दु:ख आहे. मात्र ही आजची गोष्ट नाही. याठिकाणी रोज असे काहीतरी घडत असते. या हल्ल्याला केवळ पाकिस्तान जबाबदार नाही. जोपर्यंत येथील समस्येतून योग्य मार्ग काढला जात नाही, हे संपणार नाही. बंदुकीने हा प्रश्न सुटणार नाही, तर चर्चेने हा प्रश्न सोडवता येईल. जम्मू काश्मीर मधील लोकांशी याबाबत बोलावे लागेल. आपल्या लोकांशी आपण बोलणार नाही तर कुणाशी बोलणार?” असे वादग्रस्त वक्तव्य  नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे.

आदिल अहमद दार याने ‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी हा हल्ला घडवला आहे. काकापोरा येथील रहिवासी असून. स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like