पाकिस्तानच्या मनात भारताची दहशत ; भारताचे समजून स्वतःचेच फायटर विमान उडवले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत – पाकिस्तानचा वाद सध्या शिगेला पोहंचला आहे. या वादामुळे पाकिस्तानमध्ये भारताबद्दल दहशत निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानने भारताचे समजून चक्क स्वतःचेच विमान पाडले.

गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामुळे, भारत – पाकिस्तानचा वाद सध्या शिगेला पोहचला आहे. याचदरम्यान पाकिस्तानने भारताचे समजून स्वःताचे फायटर विमान पाडल्याचे वृत्त आले आहे.

विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक हालचालीवर पाकिस्तान बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारत कधीही पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊ शकतो, या विचाराने पाकिस्तान घाबरले आहे. भारताने जर युद्धाचा मार्ग पत्करलाच तर पाकिस्तानही भारताला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. यामुळे पाकिस्तानने सीमेवर रणगाडे रवाना केले आहेत. इतकेच नव्हे तर, सियालकोट सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले असून सीमेजवळील गावे खाली करण्यात आली आहेत, याचबरोबर अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.