पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली : आमिताभ-आमिर-रणबीर आले एकत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरानजीक असलेल्या गोरीपोरा या ठिकाणी  १४ फेब्रुवारीला घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले होते. या  शहीद जवानांना श्रध्दांजली देण्यासाठी सीआरपीएफने एक विशेष गीत चित्रीत केले आहे. ”तू देश मेरा” असे या गाण्याचे शिर्षक असून सीआरपीएफने  रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि आमिर खान या बॉलीवूड कलाकारांसह  हे गाणे चित्रीत केले आहे.

या गाण्याविषयी सीआरपीएफने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. ट्विटमध्ये पुलवामा हल्ल्यामध्ये  शहिद झालेल्या जवानांना हे गाणे समर्पित असल्याची माहिती दिली आहे. तसेच या गाण्यात अमिताभ बच्चन , अमीर खान , आणि रणबीर कपूर यांनी प्रशंसनीय काम केले असल्याचे  सीआरपीएफने म्हंटले आहे.

https://twitter.com/crpfindia/status/1118884948839157762

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारताने एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं. तसेच पाकिस्तनी कलाकारांवर भारतात काम करण्यास बंदी घातली होती.