#pulwamaterrorattack : नांदेड कडकडीत बंद ठेऊन वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन- (माधव मेकेवाड)– ४३ सीआरपीएफ जवानांचा बळी घेणाऱ्या दहशतवादाविरुध्द कडकडीत आक्रोश नांदेड शहरात पाळण्यात आला आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात या संदर्भाने काल आणि आज विविध कार्यक्रम राबवून जनतेने आपला रोष व्यक्त केला. आज १६ फेब्रुवारी रोजी शहरातील व जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सोबतच पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी आसमंत गडगडले.

कश्मिरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर आरडीएक्स भरलेले चार चाकी वाहन आदळवून मोठा स्फोट घडलवला.

या स्फोटात जवळपास ४३ जवांनाना शहीदी प्राप्त झाली. स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी हजर असलेल्या इतर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने प्रत्येक भारतीयांच्या मनात आजच बदला हवा अशी भावना तयार झाली. नांदेड शहरात व जिल्ह्यात या संदर्भाने कोठे कोठे रक्तदान शिबिरे, कोठे -कोठे निधी संकलन करून जवांनाच्या मदतीसाठी तयारी केली. भारताच्या पंतप्रधानांनी सुध्दा दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना याची किंमत मोजावी लागेल असे निर्वाणीचे शब्द वापरून जोरदार धक्का दिला. आज नांदेड शहरात सकाळपासूनच बंद पाळण्यात आला. सर्व राजकीय पक्ष आणि जनता आपोआपच या बंदमध्ये सहभागी झाली आणि काफीला निघाला. वंदे मातरम, भारत माता की जय , पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणांनी आसमंताला सुध्दा अश्रु आले असतील. जनतेने सुध्दा आपली कमाई, कामकाज झुगारून बंदमध्ये पूर्णपणे सहभाग घेतला. अनेक जागी दहशतवादाचे पुतळे जाळण्यात आले.

त्याच बरोबर अनेक तालुक्यात देखील दहशतवादी संघटनांचा निषेध करण्यात आले भोकर, किनवट, बिलोली, नायगाव या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सर्व पक्षीय जनतेने श्रद्धांजली वाहिली व ह्या घटनेचा निषेध व्यक्त केला.

You might also like