Pumpkin For Hair And Skin : त्वचेसह केसांसाठी खुप लाभदायक आहे भोपळा, येथे जाणून घ्या याच्या वापराची पद्धत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भोपळ्याची भाजी बनवली जाते. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात जी आरोग्यासाठी लाभदायक असतात. आरोग्यासह भोपळा त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खुप उपयोगी आहे. भोपळ्यात पोटॅशियम, आयर्न, मँगेनीज, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, के आणि ई भरपूर प्रमाणात आढळते. त्वचा आणि केसाच्या समस्येवर भोपळा लाभदायक आहे. जाणून घेवूयात याचे फायदे…

1 त्वचेची लवचिकता कायम राहते. चेहर्‍यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि सौंदर्य कायम राहते.

2 भोपळ्यात झिंक आणि व्हिटॅमिन ई असल्याने ते त्वचेची हिलिंग प्रोसेस वाढवते. मुरूम होत नाहीत आणि डाग पडत नाहीत.

3 केस खुप कोरडे असतील तर भोपळ्याच्या मास्कचा वापर करा. हे बनवण्यासाठी 2 कप पिकलेल्या भोपळ्यात 1 चमचा खोबरेल तेल. 1 चमचा मध आणि 1 चमचा दही टाकून मिसळा. आता शॅम्पूसाठी केसांवर पेस्ट जवळपास 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर केस चांगले धुवून घ्या.

4 भोपळ्याच्या बीयांमधील खनिज आणि व्हिटॅमिनमुळे केसांची वाढ होते. तसेच केस तुटत नाही, मजबूत होतात आणि सौंदय वाढते. यासाठी नियमित भोपळ्याच्या बियांचा वापर करा.