Pumpkin Seeds Benefits : मधुमेह, केसांची वाढ अन् वजन कमी करण्यासाठी ‘प्रभावी’ आहेत भोपळयाच्या बिया, जाणून घ्या 7 आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – भाजलेल्या आणि तळलेल्या स्नॅक्सऐवजी हेल्दी स्नॅकवर स्विच करणे चांगले आहे. भोपळ्याच्या बियाण्यांचे आरोग्यासाठी फायदे बरेच आहेत. आरोग्याच्या अनेक समस्यांविरुद्ध लढण्यात ते मदत करतात. विशेषत: केसांच्या वाढीसाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणासाठी भोपळा बिया खूप फायदेशीर आहेत.

भोपळा बियांचे फायदे
भोपळा बिया हे पौष्टिक घटकांचे ऊर्जास्थान मानले जाते. भाजलेले आणि तळलेले स्नॅक्सऐवजी हेल्दी स्नॅकवर स्विच करणे चांगले आहे. भोपळ्याच्या बियाचा आहारात समावेश करून आश्चर्यकारक फायदे घेऊ शकता. आरोग्याच्या समस्यांविरुद्ध लढण्यात ते मदत करू शकतात.

विशेषत: केसांच्या वाढीसाठी आणि रक्तातील साखर नियंत्रणासाठी भोपळा बियाणे फायदेशीर मानले जातात. मॅग्नेशियम ते तांबे, प्रथिने आणि झिंक पर्यंत विविध प्रकारचे पोषक घटक असलेले हे बियाणे आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. भोपळा बियाणे बी जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, लोह आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत.

बियाण्यांमध्ये आवश्यक फॅटी असिड असतात. जे निरोगी रक्तवाहिन्या राखण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. भोपळा बियाण्याचे फायदे पुरुष आणि स्त्रियांसाठी आश्चर्यकारक आहेत.

भोपळ्याच्या बियांचे अद्भुत आरोग्य फायदे जाणून घेऊया…
1. प्रतिकारशक्ती निर्माण करतात
अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स बियांत जास्त प्रमाणात असतात. व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी करते. कमकुवत रोगप्रतिकारकशक्तीमुळे सर्दी, फ्लू, थकवा आणि इतर रोग होऊ शकतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारकशक्ती बळकटीसाठी या बियांचा आहारात समावेश करावा.

2 प्रोस्टेट आरोग्य सुधारणे
भोपळ्याच्या बियामध्ये जस्त मोठ्या प्रमाणात आढळते. जे पुरुषांच्या प्रोस्टेट समस्यांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. भोपळ्याच्या बियामध्ये प्रोस्टेटचे आरोग्य चांगले ठेवणारे अनेक घटक आहेत.

3 केसांच्या वाढीसाठी उत्तम
भोपळ्याच्या बियामध्ये कुकुरबिटिन हे एक अद्वितीय अमीनो आहे. जे केसांच्या वाढीस उपयुक्त आहे. त्यातील व्हिटॅमिन सीदेखील केसांच्या वाढीस महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भोपळ्याच्या बियांचे तेल टाळूवर लावा किंवा दररोज त्याचे सेवन करा.

4 मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर
भोपळ्याचे बियाणे मधुमेहामध्ये इन्सुलिनचे नियंत्रण करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत असल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास मदत करतात.
5. वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी बिया सर्वोत्तम स्नॅक्सपैकी एक आहे. त्यामध्ये फायबरही जास्त असते. ज्यामुळे पचन होण्यास जास्त वेळ लागतो.

6 हृदयास अनुकूल
भोपळ्याचे बिया निरोगी चरबी, फायबर आणि विविध अँटिऑक्सिडेंट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत. जे हृदयासाठी फायदेशीर आहेत. या बियामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी असिड असतात.जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करतात. बियामध्ये मॅग्नेशियमची उपस्थिती रक्तदाब नियमित करण्यास मदत करते.

7. चांगली झोप येण्यास प्रभावी
भोपळ्याच्या बियामध्ये सेरोटोनिन, एक न्यूरोकेमिकल असते. ज्याला निसर्गाची झोपेची गोळीदेखील म्हणतात. भोपळा बियात ट्रिप्टोफेन अधिक असत. हे एक अमीनो असिड जे शरीरात सेरोटोनिनमध्ये रूपांतरित करतो, ज्यामुळे रात्री शांत झोप लागते. झोपायला जाण्यापूर्वी मूठभर बिया खाल्ल्यास चांगली झोप मिळू शकते.