Pune : सराईत गुन्हेगाराकडून 2 वाहनांसह 11 मोबाईल हस्तगत, डेक्कन पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुठा नदीत पात्रात थांबलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून डेक्कन पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या २ वाहनांसह ११ मोबाईल हस्तगत केले आहेत.

राकेश जॉनी सकट (वय २१, रा. मंगळवार पेठ) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बाळासाहेब भांगले, सचिन चव्हाण व श्रीकांत लोंढे यांना चोरीची दुचाकी वाहनासह सराईत गुन्हेगार एस. एम जोशी पुलाखालील रोडवर थांबला असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तेथे जाऊन राकेश सकट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीची माहिती घेतल्यावर ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. दुचाकीच्या डिकीची झडती घेतली असता त्यात विविध कंपन्यांचे १ लाख ३९ हजार रुपयांचे ११ मोबाईल आढळून आले.

डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी पोलिसनामाला सांगितले की राकेश सकट याची पोलीस कस्टडी घेऊन केलेल्या तपासात त्याने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी एक दुचाकी चोरली असल्याचे निष्पन्न झाले. राकेश सकट याच्याकडून २ लाख २९ हजार रुपयांच्या २ दुचाकी व ११ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर, उपनिरीक्षक किशोर शिंदे, कर्मचारी राकेश गुजर, संजय शिंदे, धोडोपंत पांचाळ, सचिन कदम, बाळासाहेब भांगले, सचिन चव्हाण, विनय बडगे, दयानंद गायकवाड, गणेश तरंगे, श्रीकांत लोंढे, दादासाहेब बर्डे, शेखर शिंदे, शरद गोरे, शशिकांत ननावरे, श्रीराम कापरे, ज्योतीराम मोरे यांनी केली आहे.

You might also like