PUNE : रिक्षा ऑन कॉलचा 11 हजार नागरिकांनी केला ‘संपर्क’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात संचारबंदीत महत्वाच्या कामाला जाण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या रिक्षा ऑन कॉल या योजनेचा सव्वा आकरा हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. त्यामुळे गरजवंताना या काळातही सोय मिळत असल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

कोरोना आजाराच्या प्रादुर्भाव वाढू नये तसेच खबरदारी म्हणून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोणाला घरा बाहेर पडण्यास बंदी आहे. तर वाहने देखील रस्त्यावर अण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परंतु, अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना नागरिकांना वाहने मिळत नसत. त्यामुळे जेष्ठ व इतराना अडचणीं येत. दरम्यान विनाकरण घराबाहेर पडणाऱयांवर कारवाई सुरू आहे.

मात्र या कालावधीत एखाद्याला महत्वाच्या कामासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी पोलिसांनी तातडीची रिक्षा सेवा सुरू केली आहे. ही सेवा पुरविण्यासाठी वाहतूक पोलिस व सिटीग्लाईड या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. शहरात 180 आटो रिक्षा आहेत.

शहरात गेल्या आठ दिवसांपासून ही सेवा सुरू असून, रिक्षा मिळावी, यासाठी 11 हजार 236 नागरिकांनी कॉल केले आहेत. यात 6 हजार 396 कॉलला उत्तरे देण्यात आली. त्यातल्या 1 हजार 504 नागरिकांना प्रत्यक्षात ही सेवा पुरविण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. ही सेवा पुरविणारे रिक्षा चालक हे 45 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. प्रवास करताना चालक आणि प्रवासी यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच रिक्षा चालकाने रिक्षात हँड सँनिटायझर उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

केवळ एकच प्रवाशाची वाहतुक करणे बंधनकारक आहे. या सेवेचा फायदा घेण्यासाठी 9859198591 या मोबाइल क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधायचा आहे. त्यावर संपर्क साधल्यानंतर या नागरिकांची संपूर्ण माहिती घेतली जाते. प्रवास कोणत्या कारणासाठी करायचा आहे, याची शहानिशा करून त्यानंतर ही सेवा मिळू शकते की नाही, हे सांगितले जाते.

अतिआवश्यक कामासाठी नागरिकाची गैरसोय होऊ नये, यासाठी ही सेवा पुरविली जात आहे. नागरिकांकडून आलेल्या कॉलची शहानिशा केली जाते. यापुढील काळातही ही सेवा सुरूच राहणार आहे.

डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त