मांजा काढण्यासाठी गेलेल्या 11 वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – पतंग उडविताना अडकलेला मांजा काढण्यासाठी गेलेला ११ वर्षाय मुलगा जलशुध्दीकरणाच्या टाकीत पडून बुडल्याने ठार झाला. ही रविवारी वडगाव बुद्रुक येथील तुकाईमंदीर टेकडीलगत घडली.

अथर्व बापू गोरे (वय ११, रा. तुकाईनगर, तुकाईमंदीराजवळ, वडगाव बुद्रुक पुणे) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत सिंहगडरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अथर्व हा हिंगणे खुर्द येथील महापालिका शाळेत पाचवीत शिकत होता. रविवारी सकाळी घराजवळ अथर्व त्याच्या लहान भावाबरोबर पतंग उडवीत होता. पतंग उडत असताना मांजा जवळच तुकाईमंदीरावरील टेकवडीवर जलशुध्दीकरणाच्या टाकीला अडकला. त्यानंतर अथर्व आणि त्याचा लहान भाऊ मांजा काढण्यासाठी तेथे गेले. त्यानंतर टाकीवर चढून अथर्व मांजा काढण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा तोल जाऊन जलशुध्दीकर करण्याच्या पाण्याच्या टाकीत पडला.

त्याला पोहता येत नसल्याने तपाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्थवला पाण्यातून बाहेर काढले. अथर्वच्या मृत्यूमुळे परिसराच शोककळा पसरली. या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहे. जलशुध्दीकरण टाकीला कोणत्याही प्रकारची संरक्षक भिंत नाही. तेथे कोणीही सुरक्षा रक्षक नाही. लोखंडी गेटही तुटलेले असल्याची बाब वारंवार स्थानिकानी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. तरीदेखील वेळेवर कारवाई न झाल्याने एका चिमुरड्याला जीव गमवावा लागल्याने परिसरातील नागरिक पालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त करित आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like