पुणे पोलिस दलातील 12 अधिकाऱ्यांसह 32 जणांस पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र पोलिस दलात उल्लेखणीय कामगिरी केल्याबद्दल पुणे पोलिस दलातील 12 अधिकाऱ्यांसह 32 जणांस पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. यात 3 पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. तसेच, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस आयुक्त सुनिल यादव यांनाही पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक वर्षी पोलिस दलात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले जाते. गुरुवारी राज्यातील 800 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

पुणे शहर पोलिस दलातील पोलिस सन्मानचिन्ह जाहीर झालेल्यांची नावे.

पोलिस निरीक्षक-

क्रांतीकुमार पाटील,

महेंद्र जगताप,

संतोष बर्गे

उपनिरीक्षक-

अविनाश ढमे,

बाळासाहेब अंतरकर

कर्मचारी-

संभाजी नाईक, भरत मोरे, दिलीप पोटे, शशिकांत शिंदे, माणिक पवार, अशोक सणस, संजय चांदणे, दिलीप मोरे, संतोष पगार, अस्लम आत्तार, महादेव निंबाळकर, प्रदीप शहारे, विजय भोसले, विकास शिंदे, जिलाजी मोमीण, सुनिल बोरकर, दिलीप वाळके, संतोष मोहिते, गोपळ खांदवे, राकेश गुजर, साक्षी मुळे, राहूल शिंदे, विनोद साळुंके, अतुल गायकवाड, मंगेश चव्हाण, सुधीर इंगळे, नारायण पवार.