जनता वसाहत येथील कॅनॉलमध्ये 12 वर्षीय मुलगा पडला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जनता वसाहतीत राहणारा १२ वर्षीय मुलगा कॅनॉलमध्ये पडून वाहून गेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाकडून दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला. परंतु, पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे तो सापडला नाही. अंधार झाल्याने त्याचा शोध थांबविण्यात आला.

सुरेश राहूल बांगल (वय १२, रा. जनता वसाहत) असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, जनता वसाहत येथे कॅनॉलमध्ये एक मुलगा पडला असल्याची येथील नागरिकांनी अग्निशमन दलाला मिळाली होती. दुपारी साडेबाराच्या हा प्रकार समोर आला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पाण्यात उतरून मुलाचा शोध सुरू केला. पण, कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे त्याचा शोध लावता आला नाही.

सुरेश हा कॅनॉलमध्ये कसा पडला. तो या ठिकाणी कशासाठी आला होता, याची माहिती मिळाली नाही. पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहून गेला असण्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली.

You might also like