अफगाणीस्थानातील 143 नागरिक विमानाने मायदेशी रवाना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकून पडलेले अफगाणीस्थान येथील १४३ नागरिक विशेष विमानाने मायदेशी रवाने झाले आहेत. आज ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण घेतले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर केले. तर देशाअंतर्गत व परदेशातील विमानसेवा बंद केली आहे. परराज्यातील नागरिक व परदेशातले नागरिक अडकून पडले होते. त्यावेळीच शासनाने अडकलेल्या नागरिकांना मायदेशी पाठविण्यास परवानगी दिली. त्यानुसार पोलीस व जिल्हा प्रशासन त्यांना मायदेशी पाठविण्यास सुरू केले आहे.

दरम्यान यापूर्वी आखाती देशातील नागरिकांना मायदेशी पाठविले होते. शहरात लष्करी प्रशिक्षणासाठी अफगाणीस्थानातील लष्करी अधिकारी आले होते. शहरात अफगाणीस्थानातील विद्याार्थी शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. रविवारी (१७ मे) अफगाणीस्थानातील १४३ नागरिक पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावरुन मायदेशी रवाना झाले, अशी माहिती केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली.

—चौकट—

9 जण पुण्यात आले…

पुणे विमानतळावर रविवारी देशाच्या वेगवेगळ्या शहरात अडकून पडलेल्या पुण्यातील नऊ नागरिक परत आले. या 9 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात एका प्रवाशाला खोकल्याचा त्रास होत होता. त्या प्रवाशाला तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. ज्यांना कोणताही त्रास जाणवला नाही. त्यांना घरी पाठविण्यात आले असले तरी त्यांना विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे पतंगे यांनी सांगितले.