कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर अगरवाल, शहा, व्होरा, गांधींसह ८ जणांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोंढव्यातील तालाब फॅक्टरीसमोरील अ‍ॅल्कॉन स्टायलस सोसायटी शेजारील रॉयल एक्झॉटीका कन्स्ट्रक्शन येथील भिंत कोसळुन 15 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी 8 जणांसह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि इतरांविरूध्द भादंवि 304,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयतांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 5 लाख रूपयांची मदत देखील जाहिर केली आहे.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सागर सुरेश काळे यांनी फिर्याद दिल्यानंतर अ‍ॅल्कॉन लँडमार्कस रजिस्टर संस्थेचे भागिदार बिल्डर जगदिशप्रसाद तिलकचंद अगरवाल (64), सचिन जगदिशप्रसाद अगरवाल (34), राजेश जगदिशप्रसाद अगरवाल (27), विवेक सुनिल अगरवाल (21), विपुल सुनिल अगरवाल (21), कांचन रजिस्टर संस्थेचे भागिदार बिल्डर पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मिकांत गांधी आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेमध्ये 15 मजूरांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व बिहार राज्यातील कटिहार येथील लालमपूर तालुक्यातील आहेत. या दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिली.

पुण्यात इमारती कोसळण्याच्या घटना अनेक, कारवाई मात्र शून्य 

कोंढवा दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश 

कोंढव्यातील ‘त्या’ इमारतीच्या दक्षिण बाजूची संरक्षक भिंतही धोकादायक 

कोंढवा दुर्घटना : ‘त्या’ कामगारांची नोंदणी झाली नसल्याचे उघड