पुण्यातील ‘त्या’ पोलिस निरीक्षकाची ‘उलचबांगडी’ तर इतर 15 निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आज (गुरूवार) काही पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या उचलबांगडया केल्या तर काही जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम – 1951 मधील कलम 22 (आय) आणि कलम 22 (एन) मधील तरतुदीप्रमाणे पोलिस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होवुन कार्यभार स्विकारावा असे आदेश पोलिस उपायुक्‍त (मुख्यालय) स्वप्ना गोरे यांनी काढले आहेत.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे ः- सुनिल जयसिंग तांबे (वपोनि, हडपसर ते वपोनि, बंडगार्डन), रघुनाथ गंगाराम जाधव (गुन्हे शाखा ते वपोनि, हडपसर), राजेंद्र केशवराव मोकाशी (खडक पोलिस स्टेशन ते गुन्हे शाखा, युनिट-3), क्रांतीकुमार तानाजीराव पाटील (सिंहगड रोड ते वपोनि, वानवडी पोलिस स्टेशन), अजित शंकर लकडे (विशेष शाखा ते पीसीबी/कम्युनिटी पोलिसींग), राजेंद्र नारायणराव मोहिते (गुन्हे शाखा ते अंमली पदार्थ विरोधी पथक), भरत शिवाजी जाधव (नव्याने हजर ते वपोनि, खडक), मिलींद वसंतराव गायकवाड (विशेष शाखा ते वाहतूक शाखा), मुनाफ फरीद शेख (नव्याने हजर ते नियंत्रण कक्ष), दादासाहेब बाबुराव चुडाप्पा (नव्याने हजर ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्रामबाग पोलिस स्टेशन), दादा सोमनाथ गायकवाड (नव्याने हजर ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड), प्रभाकर निवृत्‍ती ढगे (वाहतुक शाखा ते वपोनि, कोर्ट आवार), वैशाली लक्ष्मण चांदगुडे (विशेष शाखा ते गुन्हे शाखा – ज्येष्ठ नागरिक कक्ष), सुनिल विठ्ठल भोसले (वानवडी पोलिस स्टेशन ते विशेष शाखा) आणि राजश्री शिरीषकुमार गांधी (नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा – प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष).